Congress Threatens to Launch Agitation : माथनी टोल नाक्यावरील अवैध वसुली बंद करा, अन्यथा रास्ता रोको !

Stop Illegal Collections at Mathani Toll Plaza Or will Block the Road : अर्धा पगार देऊन कर्मचाऱ्यांवर अन्याय

Nagpur : नागपूर – भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील मोद्याजिकच्या माथनी टोल नाक्यावर ओव्हरलोडच्या नावाखाली अवैध वसुली केली जात आहे. याशिवाय येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी २० हजार रुपये वेतन दिले जायचे, ते आता केवळ १० हजार रुपये दिले जात आहे आणि त्यांच्याकडून १२-१२ तास काम करवून घेतले जात आहे. हा सरळ सरळ अन्याय आहे. व्यवस्थापनाने हे सर्व बंद करून आम्ही सुचवलेल्या उपाययोजना कराव्या, अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी दिला आहे.

टोल प्लाझा व्यवस्थापनाला गोडबोले यांनी १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा १३ ऑक्टोबरला राज्याचे माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, राजा तिडके, अनुराग भोयर आदींच्या सहभागाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि माथनी टोल प्लाझा व्यवस्थापनाची असेल, असेही देवेंद्र गोडबोले यांनी स्पष्ट केले आहे.

Local body election : नगरपरिषदेच्या शिलेदारांचे आरक्षण जाहीर !

काँग्रेसतर्फे गोडबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात टोल प्लाझा व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये स्थानिक नागरिकांचे मासीक पास पूर्वीप्रमाणेच लागू करण्यात यावे. स्थानिक ट्रक चालक व मालकांकडून अवैधरित्या करण्यात येणार वसुली तात्काळ थांबवावी आणि त्यांना पथकरात सवलत द्यावी. ओव्हरलोडच्या नावाखाली सुरू असलेली अवैध वसुली तात्काळ थांबवावी. टोल प्लाझावर सुरूवातीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना फलकावर नमूद केलेल्या दरानुसार वेतन देण्यात यावे.

Shiv Sena Workers Erupt in Protest : वणीत उबाठाचा गनिमी कावा, पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर घातले लोटांगण

जे कर्मचारी सुरूवातीपासून टोल प्लाझावर कार्यरत आहेत, त्यांना नोकरीत कायम करण्यात यावे. नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर NHAI च्या निर्देशानुसार सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. टोल परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असतात, ते त्वरीत सुरू करण्यात यावे. टोल प्लाझावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.