State government directed to file affidavit within four weeks : राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Mumbai : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाला (जीआर) अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने मराठा समाजातील पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ठरवलेली कार्यपद्धती काही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आव्हान दिली होती. या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले की, “राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र आणि त्यावरील बाजू ऐकल्या शिवाय शासनाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देता येणार नाही.” कोर्टाने राज्य सरकारला आणि संबंधित प्रतिवादींना चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Judiciary : देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असे वातावरण नाही
हायकोर्टाच्या या निर्णयामुळे सरकारला तातडीने दिलासा मिळाला असून, मराठा समाजालाही हा निर्णय अनुकूल ठरला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली असून, त्यावेळी शासन आणि याचिकाकर्त्यांच्या बाजूंचा सविस्तर युक्तिवाद होणार आहे.
राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरनुसार, मराठा समाजातील अशा व्यक्तींना ज्यांच्या पूर्वजांची नोंद कुणबी म्हणून झाली आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. या प्रमाणपत्राच्या आधारे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
Shivrajabhishek : महाराष्ट्र’ चित्रपटाचा पहिला सीन शिवराज्याभिषेकाचा असावा!
मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून राज्यात अत्यंत संवेदनशील ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने जीआर जारी करून मराठा समाजातील काही घटकांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, या जीआरला विरोधी बाजूने न्यायालयात आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने आता तात्पुरती स्थगिती नाकारत सरकारचा जीआर कायम ठेवला आहे, त्यामुळे मराठा समाजासाठी हा निर्णय ‘मोठा दिलासा’ ठरला आहे.
_____