Girish Mahajans blunt response to Dada Bhuses statement : दादा भुसे यांच्या वक्तव्याला गिरीश महाजनांचा मिश्किल प्रत्युत्तर
Nashik : नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच महायुतीतील नेत्यांमधील ‘शब्दयुद्धा’ने रंग चढवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या “पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल” या वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मिश्किल टोला लगावला आहे. “कदाचित दादा भुसे यांचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ठ संबंध असतील, त्यामुळे ते त्यांनाच विनंती करतील,” अशी चिमटा महाजनांनी घेतला.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेली रस्सीखेच अद्याप कायम आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये या पदासाठी तीव्र अंतर्गत स्पर्धा आहे.
New controversy : दुष्काळ असो किंवा नसो लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात !
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघाला का, असा प्रश्न पत्रकारांनी दादा भुसे यांना विचारला असता त्यांनी हसत उत्तर दिलं “आता हा विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल.”
यावर गिरीश महाजनांनी चटकेदार प्रत्युत्तर दिलं. “भुसे यांचे ट्रम्प यांच्याशी काहीसे जवळचे संबंध असावेत. कदाचित ते त्यांना फोन करून सांगतील की ‘काही तरी करा’. माझे तसे कोणतेच संबंध नाहीत, मी अमेरिकेलाही गेलो नाही,” असं महाजनांनी मिश्किलपणे म्हटलं.
Ladki bahan Yojana : पती किंवा वडील हयात नसल्यास इकेवायसी कशी?
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रीपदाला कुंभमेळ्याच्या तयारीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. प्रशासनिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे पद निर्णायक मानलं जातं. त्यामुळे या पदासाठी महायुतीतील सर्व गट प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून त्यात गुंतले आहेत. भाजपकडून गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि माणिक कोकाटे, तर शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे हे प्रमुख दावेदार आहेत.
एकूणच, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याऐवजी ‘ट्रम्प’ टोलेबाजीमुळे आणखीनच रंगत चालला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी हा वाद मिटतो का, की तो महायुतीतील गटांतर्गत स्पर्धेचं प्रतीक बनतो, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
न ____