Local Body Elections : खामगावात महायुतीत ताटातूट?, निवडणुकीपूर्वी टेंशन वाढले

All-Party Alliance Against BJP in Active Mode : समविचारी पक्ष अॅक्टिव्ह मोडवर; भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग

Khamgao राज्यात आणि केंद्रात सत्तेच्या शिखरावर असलेल्या भाजपला खामगावात मात्र स्थानिक स्तरावर मोठे आव्हान उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडीचे हालचाली वेग घेत आहेत. शहरातील राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे.

काँग्रेसने या विरोधी आघाडीचा पुढाकार घेत उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएम आणि रिपाइंच्या गटांशी संवाद सुरू केला आहे. शिंदेसेनेच्या स्थानिक भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची गर्दी वाढली असून अनेक ठिकाणी बैठकांचे सत्र रंगू लागले आहे.

Flood relief fund : टीकेनंतर हालचाल, आता श्रेयासाठी शर्यत, ‘होमग्राऊंड’वरून वाद

आरक्षण जाहीर झाल्याने अनेक प्रस्थापित नगरसेवक व इच्छुकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ‘सुरक्षित प्रभाग’ आणि ‘योग्य पक्षसंघटना’ शोधण्यासाठी अनेक जण हालचाली करत आहेत. काँग्रेसच्या एका विद्यमान नगरसेविकेवर भाजपचे लक्ष केंद्रीत झाल्याच्या चर्चांनी रंगत आणली असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका ‘दादा’च्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे.

“निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांशी आमचे बोलणे सुरू आहे. भाजपविरोधात एकसंध लढत उभी राहावी, हा आमचा प्रयत्न आहे,” असे खामगाव शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले यांनी म्हटले आहे.

“वंचित बहुजन आघाडीने आपल्या प्रभावी प्रभागांबरोबरच इतर वार्डातही जोरदार तयारी सुरू केली आहे. युतीसंदर्भातला अंतिम निर्णय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबरनंतर घेतला जाईल,” असा दावा वंचितचे शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे यांनी केला आहे.

“तुल्यबळ उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. समाधानकारक जागा वाटप न झाल्यास राष्ट्रवादी स्वतंत्र तयारी करेल. भाजपविरोधी आघाडीत आमचा सहभाग अटींसहच असेल,” अशी भूमिका अजित पवार गटाचे दिलीपकुमार सानंदा यांनी स्पष्ट केली आहे.

Ladki Bahin Scheme : ओटीपी येईना, नेटवर्क गायब; लाभार्थी त्रस्त!

“खामगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता होती. कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी जोरात सुरू आहे,” असे भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार यांनी म्हटले आहे.