Politics Takes Flight Over a Pigeon : कबुतरवरून टगुटूर गू’, ..तर जैन मुनींना महाराष्ट्रातून पळवून लाऊ !

Jain sages should be abducted from Maharashtra : ‘आम्ही गिरगावकर’ राजकीय लोक नसून साधी माणसे

Mumbai : कबुतराच्या वादावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटू लागले आहे. राजकीय पक्ष स्थापन करू, या जैन मुनींच्या घोषणेनंतर कबुतर वादात आणखी भर पडली आहे. या वादावर रोज क्रिया-प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादात आता मुंबईतील ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने उडी गेतली आहे. मुंबईतील कबुतरखान्यांच्या संदर्भात पैसा आणि डॉक्टरांना मूर्ख म्हणण्याचा विषय येत असेल तर ‘आम्ही गिरगावकर’ गप्प बसणार नाही. त्यांनी शस्त्र हाती घेतली तर आम्हीही घेऊ आणि त्यांना महाराष्ट्रातून पळवून लाऊ, असा इशारा आम्ही गिरगावकर संस्थेने दिला आहे.

मुळात मुंबईत जैन लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे या वादात गुजराती लोकांना ओढण्याचा प्रयत्न सोयीस्करपणे सुरू आहे. आगामी निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर गुजराती लोकांना आपल्याकडे खेचण्याचा हा प्रयत्न आहे. हा वाद मराठी विरूद्ध जैन आणि मराठी असा नाहीच, तर मराठी आणि गुजराती विरूद्ध जैन असा हा वाद आहे. पद्धतशीरपणे हा वाद घडवून आणला जात आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही, असे ‘आम्ही गिरगावकर’चे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी म्हटले आहे.

Mahayuti Politics : शिंदेंच्या योजनांना का लावला जातोय चाप ?

जैन मुनींनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याप्रति असलेला आदर संपला आहे. हा आता राजकीय मुद्दा झालेला आहे. त्यांनी पैसा आणि टॅक्सचा विषय काढला आहे. पण त्यांच्या पैशांची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी त्यांच्या प्रांतात मारवाडला परत जावे, असा सल्ला सागवेकर यांनी दिला आहे. डॉक्टरांवर गलिच्छ टिका करणाऱ्यांनी कबुतराची विष्ठा खाऊनच बरे व्हावे, असा खोचक सल्लाही सागवेकर यांनी दिला आहे.

Sharad Pawar : शरद पवारांकडून संघटनात्मक बदलाची तयारी

‘आम्ही गिरगावकर’ राजकीय लोक नसून साधी माणसे आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे लोक आहोत. महाराष्ट्रद्रोह्यांना सडेतोड उत्तर देण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली आहे. त्यामुळे जैन मुनींनी शस्त्रे उचलली तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ आणि जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून तेव्हा आमचा प्रत्येक माणूस जैन मुनींना महाराष्ट्रातून पळवून लावेल, असेही ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने म्हटले आहे.