व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sameer Meghe : आता ‘हे’ लोकही राहुल गांधींसारखेच करत आहेत !

Sameer Meghe : आता ‘हे’ लोकही राहुल गांधींसारखेच करत आहेत !

BJP Targets Opposition Leaders, Says They Are Acting Like Rahul Gandhi : प्रशासकीय बाबतीत काय चुका झाल्या, ते तपासून घ्यावे

Nagpur : भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात एकाच पत्त्यावर २०० मतदारांची नावे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या विषयावरून त्यांना अनेकांनी धारेवर धरले. यासंदर्भात आता आमदार मेघे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्याकडून पराभवाची चव चाखल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये त्यांना विजयाची खात्री नाही. त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या पक्षावर बिनबुडाचे, हास्यास्पद आरोप केले जात आहेत, असे ते म्हणाले.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार मेघे म्हणाले, हे आरोप राज्याचे माजी मंत्री रमेश बंग यांनी केले आहेत. बंग १५ वर्षे आमदार होते, मंत्रीही राहिलेले आहेत. खरं पाहता त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे. पण विकासावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे असे फालतुचे आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या आरोपानुसार प्रशासकीय बाबींमध्ये चूक झाली असू शकते. ती त्यांनी तपासली पाहिजे. पण असे न करता ते आरोप करत सुटले आहेत.

Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ चर्चांना दिला विराम !

चुकीचे आरोप केल्यापेक्षा त्यांनी विकासावर बोलावे. आमचा एक-एक नगरसेवक त्यांना एक-एक घर दाखवेल. मेघे परिवाराचे २७ लोक राहतात. दोन कुटुंबांची २५ ते ३० वर्षांपासून घरे आहेत. निलेश मेघे आणि मुंकुंद मेघे तेथे राहतात, अशी माहिती आमदार मेघे यांनी दिली. बंग परिवारातील ३० पैकी २० लोक कुठे राहतात, हे त्यांनी सांगावे, असे आव्हान मेघेंनी दिले. मी आमदार झाल्यापासून वानाडोंगरी मतदारसंघामध्ये ४०० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत, हे त्यांच्या लक्षात आले नाही का, असा सवालही आमदार मेघे यांनी केला.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं चतुर्थ श्रेणी देण्याची मागणी पूर्ण होऊ शकत नाही

रमेश बंग या मतदारसंघातून १५ वर्ष आमदार होते. त्यानंतरही न भूतो अशी ७८ हजार मतांची आघाडी आम्हाला मिळाली आहे. त्यांनी केलेल्या आरोपानुसार प्रशासकीय चूक असू शकते. यामध्ये पत्ता बरोबर नसणे, फॉर्म भरताना टायपींग मिस्टेक होणे, या बाबी घडू शकतात. हे त्यांनी तपासले पाहिजे, असा सल्लाही आमदार मेघे यांनी दिला. माजी आमदार घोडमारे यांनी माझ्याविरोधात निवडणूक याचिका टाकली आहे. या प्रकरणाची चौकशी लागली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

error: Content is protected !!