Swabhimani Shetkari Sanghatna : तर गाठ आमच्याशी आहे, ‘स्वाभिमानी’चा सरकारला इशारा

Rally Over Farmers’ Demands : शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नका, मलकापूरात दुष्काळ दखल मोर्चा

Malkapur कर्जमाफी, दुष्काळी मदत, बोगस बियाणे, तसेच बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यांवर लावला जाणारा होल्ड यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या सर्व प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास “गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे”, असा तीव्र इशारा स्वाभिमानी युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात ११ ऑक्टोबर रोजी जनता कॉलेज ते तहसील चौक असा दुष्काळ दखल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता.

Banana-Growing Farmers’ Protest : अंजनगाव बोर्डाला बुरहानपूरचा भाव द्या, शेतकऱ्यांचे आंदोलन

संघटनेच्या प्रमुख मागण्या
सर्व शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा,
दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी,मागील वर्षाचा राहिलेला पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा,
बँकांनी लावलेले होल्ड तात्काळ उठवावे,
२०२५ चा खरीप पीक विमा शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तहसील चौकात झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडताना सांगितले की, “शेतकऱ्यांचा संयम सुटला तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.” तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

Vote theft : भाजपने मतचोरी करून विजय मिळवला, युवक काँग्रेसचा हल्लाबोल

मोर्चात किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के, स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, रामदास डोसे, गोलू पाटील, पराग बोंडे, गोपाल रायपुरे, अमोल आखरे, बबन तायडे, गौरव वराडे, विनायक बोरसे, सुरेश मराठे, गजानन तुरक आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.