Maoism : नक्षलवादाचा शेवट जवळ, माओवाद इतिहास ठरणार

PM Modis big statement after naxal surrender : नक्षल आत्मसमर्पणानंतर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

New Delhi : छत्तीसगडमधील घनदाट जंगलांमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केले असून या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “देशातून लवकरच माओवाद हद्दपार होईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी माओवादी दहशतवादाच्या प्रश्नावर सविस्तर भाष्य केले.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 50 ते 55 वर्षांमध्ये माओवादामुळे हजारो निरपराध लोकांचा बळी गेला. अनेक सुरक्षा दलातील जवानांना नक्षलवादी हिंसेत प्राण गमवावे लागले. कित्येक तरुण या हिंसेत शहीद झाले. नक्षलवादी भागात विकासाला कधीच वाव मिळू दिला गेला नाही. “शाळा उभारू दिली नाही, रुग्णालय बांधू दिले नाही. जितके विकासाचे काम झाले, ते नक्षलवाद्यांनी बॉम्बने उडवले.”

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काळी दिवाळी आंदोलन

मोदी म्हणाले की, माओवादी दहशतवादामुळे अनेक दशकांपासून या भागात विकासाचा किरण पोहोचू शकला नाही. एक मोठी लोकसंख्या या दहशतीमुळे वंचित राहिली होती. पण आता परिस्थिती बदलत आहे. “50-55 वर्षे ज्यांनी दिवाळी पाहिली नाही, त्यांना आता आनंदाने दिवे लावता येतील. त्यांची दिवाळी उजळून निघेल,”

पंतप्रधानांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. “काँग्रेसच्या काळात अर्बन नक्षलवाद फोफावला. नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या घटनांवर सेन्सॉरशिप लादली गेली. देश आणि जगापासून या घटनांना लपवले गेले. हे मोठे पाप होते,” असा आरोप त्यांनी केला.

मोदींनी आकडेवारी देत सांगितले की, गेल्या 11 वर्षांत देशातील 125 जिल्हे नक्षलप्रभावित होते. आज ती संख्या केवळ 11 जिल्ह्यांपर्यंत खाली आली आहे. यापैकी फक्त तीन जिल्हे सर्वाधिक नक्षलग्रस्त मानले जातात. “केवळ 75 तासांत 303 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आहेत. हे काही सामान्य नक्षली नव्हते, तर अत्यंत जहाल माओवादी होते, ज्यांच्या डोक्यावर लाखोंपासून कोटींपर्यंत बक्षिसे होतीl.”

मोदींनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी देशातील जवळपास सर्व मोठी राज्ये नक्षलवादी हिंसेने त्रस्त होती. त्या वेळी राज्यघटनेप्रमाणे शासन करणे या भागात अवघड झाले होते. “जे आज संविधानाची प्रत डोक्याला लावून नाचतात, त्यांनीच माओवादी आणि नक्षलवाद्यांच्या रक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती.”

Sharadchandra Pawar : कापूस, सोयापेंडची निर्यात वाढवा म्हणत राष्ट्रवादी आक्रमक !

एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड मानला जाणारा बस्तर आज बदललेला आहे. बस्तरमध्ये आता विकासाचा प्रकाश पोहोचला आहे. “बस्तर ऑलम्पिकचे आयोजन तिथल्या तरुणांनी केले, हजारो तरुण त्यात सहभागी झाले. हा बदल केवळ सुरुवात आहे. माओवाद आता इतिहास ठरणार आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.