Local Body Elections : सावनेरमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला !

Prestige at Stake in Saoner: BJP MLA Ashish Deshmukh vs Congress Leader Sunil Kedar : केदारांची नागपूर ग्रामीणमधील यंत्रणा खिळखीळी करण्याचा पूर्ण प्रयत्न

Nagpur : जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. फक्त दिवाळी होण्याचा अवकाश आहे. त्यानंतर निवडणुकीचा माहौल पेटायला सुरूवात होणार आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चांगल्याच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण या मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. आशिष देशमुख आणि माजी आमदार सुनील केदार यांच्यात थेट सामना होणार आहे.

नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये सुनील केदार यांची चांगली पकड आहे. पण २०२४मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करून भाजपने ती पकड सैल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने काँग्रेसमधून डॉ. आशिष देशमुख यांना आपल्याकडे घेऊन केदारांना एक हादरा दिला आहे. याशिवाय मनोहर कुंभारेंसारखे सुनील केदारांचे कट्टर समर्थक आपल्याकडे घेऊन भाजपने केदारांची नागपूर ग्रामीणमधील यंत्रणा खिळखीळी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यामध्ये भाजप नेते कितपत यशस्वी ठरले, हे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

Dr. Nitin Raut : ‘नमकहराम’ वरून भडकले काँग्रेसचे आमदार डॉ. राऊत !

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि आक्रमक नेते सुनील केदार यापूर्वी सावनेर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून आलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात ते राज्याचे क्रीडामंत्री सुद्धा राहिलेले आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणात त्यांना जेलवारी करावी लागली. त्यामुळे निवडणूक लढवण्यावर त्यांना बंदी घालण्यात आली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पत्नीला उभे केले होते. पण भाजपने योग्य व्युव्हरचना आखत त्यांना पराभवाचा धक्का दिला.

Dr. Nitin Raut : ‘नमकहराम’ वरून भडकले काँग्रेसचे आमदार डॉ. राऊत !

केदार यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी काटोलचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र व काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. आशिष देशमुख यांना तेथून लढवले. या निवडणुकीत डॉ. देशमुख विजयी झाले. असे असले तरी सावनेर तालुका आणि एकंदरीतच नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांची पकड आजही असल्याचे मानले जाते. त्यामुळे सावनेर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी डॉ. आशिष देशमुख यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार, असे एकंदरीत चित्र सध्या दिसते आहे.