Sudhir Mungantiwar : उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

Health temple is confluence public participation, service spirit,modern facilities – Sudhir Mungantiwar : हे आरोग्य मंदिर लोकसहभाग, सेवाभाव, आधुनिक सुविधांचा संगम – सुधीर मुनगंटीवार

Chandrapur : पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलासाठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४९० इतका रुपयांचा निधी मंजूर करून आरोग्य मंदिर उभारलेले आहे. हे आरोग्य मंदिर म्हणजे लोकसहभाग, सेवाभाव आणि आधुनिक सुविधांचा संगम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण सोहळ्यात केले.

पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार मुनगंटीवार म्हणाले की, “उमरी पोतदार आरोग्य मंदिर हे लोकसहभाग, सेवाभाव आणि आधुनिक सुविधांचा संगम आहे. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, कळमना, मानोरा आणि पोंभुर्णा यानंतर आता उमरी पोतदार हा आरोग्य सेवेतील प्रेरणादायी टप्पा ठरणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्याचा पालकमंत्री असताना महाराष्ट्रातील सर्वाधिक निधी चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी देण्यात आला.

Sadavarte Vs Raj Thackeray : टन टन टोल झालं, भोंगे झाले आता…

ग्रामस्थांच्या एकोप्याने आणि भूमिदान देणारे लक्ष्मण सायलू सल्लम व सोयाजी नामेवार यांच्या योगदानामुळे हे आरोग्य मंदिर सामाजिक आधारावर उभे राहिले आहे. आमदार मुनगंटीवार यांनी नागरिकांना या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नियमित आरोग्य तपासणी करून निरोगी जीवन जगण्याचे आवाहन केले.

या केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री, सर्व आवश्यक सुविधा तसेच गर्भवती महिलांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत विनोद देशमुख यांनी “निक्षय मित्र” म्हणून तालुक्यातील ४३ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते या रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे, जिथे हेलिकॉप्टर ॲम्बुलन्ससाठी हेलिपॅडची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, लवकरच १४० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल सुरू होणार असून, त्यात हेलियम न वापरणारी देशातील पहिली एमआरआय मशीन बसविण्यात आली आहे.

महिलांसाठी ‘पिंक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रिमंडळाची विशेष मान्यता देऊन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे कळमना, मानोरा, उमरी पोतदार आणि पोंभुर्णा परिसरात अत्याधुनिक आरोग्य सेवा सुलभ झाल्या आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे यांचा आरोप : महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार

याच कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की, श्रीशैलम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्यानमंदिर उभारण्याचे कार्य त्यांच्या कार्यकाळात झाले असून, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ध्यानमंदिराला भेट दिली. तसेच अयोध्येतील राममंदिर, संसदेच्या इमारतीतील दरवाजे आणि पंतप्रधानांची खुर्ची ही बल्लारपूरच्या लाकडापासून तयार करण्यात आली असल्याचा त्यांनी उल्लेख केला.