Marathas will lose their seats after getting certificates Wadettiwar : मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाल्याने जागा जाणार – वडेट्टीवार
Nagpur : राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं की, “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना मोठा फटका बसणार आहे. ओबीसी समाजाचा माणूस निवडणुकीत दिसणारही नाही, कारण ज्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे ते सगळ्या जागा घेऊन जाणार आहेत.”
वडेट्टीवार म्हणाले “ओबीसी समाज मोठा आहे, पण २ सप्टेंबरच्या जीआरमुळे मराठा समाजातील काहींना ओबीसींचे प्रमाणपत्र मिळाल्याने स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा फायदा होणार आहे. हे बळी तो कान पिळीप्रमाणे होईल. आम्ही आकडेवारीसह हे निवडणुकांनंतर दाखवून देऊ.” त्यांनी सरकारला जीआर रद्द करण्याची मागणी केली आणि “ज्यांना हे नुकसान होत नाही असं वाटतं, त्यांनी नीट विचार करावा,” असा टोलाही त्यांनी ओबीसी नेत्यांना लगावला.
Bachchu Kadu : अरे आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका !
वडेट्टीवार म्हणाले की, “पहिल्यांदा पात्र हा शब्द होता, तो आता काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे, ते त्याचा वापर महाराष्ट्रात कुठेही नोकरी, शिक्षण, सवलतींसाठी करू शकतात. जीआर चार जिल्ह्यांसाठी असला तरी त्याचा प्रभाव संपूर्ण राज्यावर होतो. हे सत्ताधारी मंत्र्यांना समजत नसेल, तर त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते.”
शेतकरी परिषदेत बच्चू कडू यांनी केलेल्या “आमदाराला कापून टाका” या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “कापून टाका वगैरे भाषा योग्य नाही. बच्चू कडू यांची भूमिका शेतकरी हिताची आहे, पण मतदानाचा अधिकार हा तलवारीपेक्षा धारदार आहे. एवढं पुरेसं आहे त्यांना वठणीवर आणण्यासाठी.”
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावून घेतले !
कन्नड तालुक्यातील उपोषण मागे घेण्याच्या घटनेवरून वडेट्टीवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले “आंदोलकाला बंगल्यात बोलावलं, नशीब आहे! उद्याच उपोषण मंत्र्यांच्या घरात करता येईल. पुढचं उपोषण थेट त्यांच्या घरात करा, आम्हाला वाटेल तेव्हा ज्यूस पाजू,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
ओबीसी समाजाच्या वसतिगृह आणि शैक्षणिक योजनांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले “ओबीसींसाठी हॉस्टेलला पैसे नाहीत. सात टक्के लोकांना इतके पैसे देता, पण दीड लाख तरुणांसाठी ५०० कोटी देऊ शकत नाही. एकही नवीन वसतिगृह उभं राहिलेलं नाही. ३६ वसतिगृहं फक्त कागदावर आहेत. ही बनवा-बनवी सुरू आहे.”
Atul Save : नाशिकमध्येही होणार महाज्योतीचे प्रशिक्षण केंद्र !
ते पुढे म्हणाले “महाज्योती योजना मी सुरू केली होती, ओबीसींच्या १,३०० विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली होती. आता तो आकडा १०० वर आणला आहे. २ सप्टेंबरचा जीआर म्हणजे नवा लॉलीपॉप आहे. सरकार ओबीसी समाजाला फसवत आहे.”
वडेट्टीवार यांनी पुढे स्पष्ट केले की, “आमचे आरक्षण कोर्टामुळे वाचले आहे. कोर्टाने जनगणना करा म्हणून सांगितलं, पण सरकारने ती केली नाही. कोर्टाने वैतागून जुन्या पद्धतीने निवडणुका घ्या असं सांगितलं. २७ टक्के आरक्षण वाचलं आहे, पण आधीच निवडणुका घेतल्या नाहीत, याचं उत्तर सरकारनं द्यावं.”
“राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा बाहेर काढला. सध्या जो बोगसपणा चालतोय, त्यावर जर मोर्चा निघत असेल, तर तो राहुलजींच्या मुद्द्यांवर आधारित आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक चर्चेला तयार आहोत.” असेही त्यांनी स्पष्ट केले.
_____