Maharashtra politics : निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला

Satej Patils attack on the mahayuti government : सतेज पाटलांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Kolhapur : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेचाच हरताळ फासण्याचा प्रकार आहे,” असे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

सतेज पाटील म्हणाले की, “राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, तर बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत निधीच्या आमिषाने मतं मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जनतेचा अपमान आहे. लोक निधीवर नव्हे, तर कामांवर विश्वास ठेवतात,” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

Local Body Elections : जिल्हा परिषदेसाठी रंगणार जोरदार सामना

दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापूरमधील कसबा बावडा येथे भारतवीर मित्र मंडळाच्यावतीने पारंपारिक म्हैस पळवण्याची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत यंदा महिलांनीही उत्साहाने भाग घेतला. या ठिकाणी सतेज पाटील आणि शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला.

राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडींवर बोलताना सतेज पाटील म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे काँग्रेसचं प्रमुख उद्दिष्ट आहे. काही ठिकाणी आघाड्या होतील, तर काही ठिकाणी आम्हाला स्वतंत्र लढा द्यावा लागेल. मनसेबाबत मात्र अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.”

Damage to Farmland Due to Waterlogging : नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी चढले टॉवरवर!

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरत त्यांनी म्हटलं, “रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईतील मोठे प्रकल्प एकाच व्यक्तीच्या ताब्यात देऊन हे सरकार महाराष्ट्र विकतंय. ही स्थिती चिंताजनक आहे.”

अजित पवार गटाबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, “भाजपला सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट हवे होते; मात्र आता त्यांनाच संपवण्याचं काम सुरू आहे.”

Navneet Rana : राज-उद्धव पैसा व खुर्चीसाठी एकत्र

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावर भाष्य करत त्यांनी टेंडर रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. तसेच ऊस हंगामाबाबत त्यांनी सांगितले की, “कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी एफआरपीवर तातडीने तोडगा काढावा. आम्ही सत्तेत असताना राजू शेट्टींसह चर्चा करून तोडगा काढत होतो. आज मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारकडे दुय्यम ठरत आहेत.”

_____