Nana Patole strongly criticized the government in the Beed case : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा संतप्त सवाल
Nagpur बीड येथील सरपंच हत्येप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडविरोधात मकोकाची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र तरीही विरोधक आक्रमकच आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा जीव घेतल्यावरच सरकार स्वस्थ बसणार आहे का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तो आत्महत्येचाच प्रयत्न होता. या सरकारला देशमुख कुटुंबातील किती लोकांचे जीव हवे आहेत? आणखी जीव गेल्यावरच सरकार या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई करणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
National Youth Day : १०८ सामूहिक सूर्यनमस्कारांनी भारावली शेगावनगरी !
देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटूनही अद्याप एक आरोपी फरार आहे. कराडविरोधात अद्याप मकोका लावण्यात आलेला नाही. सरकार प्रायोजित बीड आणि परभणी प्रकरणामुळे जंगलराज निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राची बदनामी करणे थांबविले पाहिजे. आरोपींवर कारवाई व्हायला हवी. राज्यात दिशाभूल करण्याचे काम सरकारने थांबवावे, असे नाना पटोले म्हणाले.
Prataprao Jadhav : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणार !
राज्य शासनाने जाणुनबुजून एसआयटी बदलविली. मुळ मुद्द्याकडून लक्ष भटकवण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापत ठेवले आहे. या प्रकरणात कोण मोठे नेते शामील आहेत, याची सर्व माहिती गृह खात्याकडे आहे. मात्र कारवाई टाळल्या जात आहे. हे खुन्यांचे सरकार आहे व राज्यात जंगलराजच सुरू आहे असा आरोप पटोले यांनी लावला.
परभणी प्रकरणात तरुणांचा जीव गेला होता. मात्र त्याचा दम्याच्या आजाराने मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ती खोटी माहिती होती व त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणू, असा दावा पटोले यांनी केला.