Fadnavis government’s big decision : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Mumbai : राज्यातील बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. घुसखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शिधापत्रिका रेशन कार्ड पडताळणीसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यात राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची काळी यादी तयार केली जाणार आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही शासकीय कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही. याशिवाय त्यांच्या नावावर आधीपासूनच काही अधिकृत दस्तऐवज जसे की आधार, रेशनकार्ड, पॅनकार्ड किंवा इतर सरकारी प्रमाणपत्रे जारी झाली असल्यास, त्यांची पडताळणी करून ती रद्द, निलंबित किंवा निष्क्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Anil Deshmukh : संजय राऊत यांचे नाव कोंढाळीच्या यादीत आलेच पाहिजे !
या संदर्भात दहशतवाद विरोधी पथका कडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, १,२७४ बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांची यादी तयार करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींच्या नावावर कोणतेही अधिकृत दस्तऐवज असल्यास, त्याची तातडीने कारवाई करून अहवाल एटीएस कडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय पुढे उघडकीस येणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांची स्वतंत्र यादी तयार करून ती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यायोगे सर्व विभागीय आणि प्रादेशिक कार्यालयांना आवश्यक ती दक्षता घेता येईल.
सरकारच्या नव्या आदेशानुसार, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवरून शिधापत्रिका वितरित करताना अर्जदाराचे कागदपत्र आणि राहण्याचे ठिकाण यांची कठोर पडताळणी करणे बंधनकारक असेल. सर्व विभागांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच तिमाही प्रगती अहवाल सरकारकडे सादर करावा, अशा स्पष्ट सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
Female Doctor Commits Suicide : पोलिसच असे बलात्कार करत सुटले तर..!
राज्य सरकारच्या या पावलामुळे आता महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरीवर आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.








