Sudhir Mungantiwar celebrates Diwali with slum children: मिठाई, साहित्य व आत्मीयतेने उजळला दुर्गापूर झोपडपट्टीतील दीपोत्सव
चंद्रपूर : दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून दाखवणारा चंद्रपूर येथे हृदयस्पर्शी उपक्रम ठरला.जनतेशी नातं हे केवळ राजकारणापुरतं नाही तर भावनांचं असावं, हे पुन्हा एकदा सिद्ध करत आ.मुनगंटीवार यांनी दुर्गापूर येथील वॉर्ड क्र.३ मधील झोपडपट्टीतील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या उपस्थितीने परिसर उजळला, आणि त्या निरागस चेहऱ्यांवर आनंदाची चमक उमटली. मिठाई, शालेय साहित्य व गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करून त्यांनी प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत आशेचा दिवा प्रज्वलित केला. संवेदनशीलता, आपुलकी आणि समाजाशी असलेलं नातं हेच मुनगंटीवारांच्या दिवाळी साजरीकरणाचं खरं सौंदर्य ठरलं.
दुर्गापूर येथील वॉर्ड क्र.३ मधील झोपडपट्टीत आमदार मुनगंटीवार पोहोचताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुला-मुलींसह येथील नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. मिठाई, शालेय साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करत त्यांनी सर्वांसोबत दीपोत्सवाचा आनंद सामायिक केला.
BMC Election 2025: भाजपचा “150 पार” नारा, शिंदे दिल्लीला रवाना
निरागस हास्यामध्येच दिवाळीचा खरा आनंद दडला आहे,” असे ते म्हणाले. “२०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील. त्या वेळी याच चिमुकल्यांच्या हातात देशाचे भविष्य असेल. त्यांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक मुलामध्ये एक तेजस्वी किरण दडलेला आहे; तो उजळवण्याची जबाबदारी समाजाची आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या भावनिक आणि आत्मीयतेने भारलेल्या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, पालक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये रुद्र नारायण तिवारी, श्रीनिवास जंगमवार, नरेंद्रसिंग दारी, केमा रायपुरे, हनुमान काकडे, अनिता भोयर, राकेश गौरकार, विलास टेंभुर्णे, देवानंद थोरात, अर्चना रायपुरे, सुनील भरेकर, रंजना किन्नाके, भोजराज शिंदे, अरविंद बोरकर, सुरेखा थोरात, रवि रामटेके आदींचा समावेश होता.
Bangladeshi infiltrators : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार !
या उपक्रमाने समाजात आपलेपणाची भावना जागवली असून, दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणारा प्रवास,झोपडपट्टीतील चिमुकल्यांच्या डोळ्यांतील आनंदात स्पष्ट दिसून आला.








