Local Body Elections : मतदारयादीत सुधारणा झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

MNS Files Complaint with Election Officials Over Voter List : मनसेची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार, अकोला मतदारयादीत प्रचंड घोळ

Akola जिल्ह्यातील मतदारयादीत हजारो दुबार नावे असल्याचे उघड झाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करून, मतदारयादी शुद्धीकरण झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३ मधील बूथ क्रमांक १६३, १६४, १६५, १८३, १८४, १८५, १९४, ११८, १८२ आणि २०३ या मतदान केंद्रांमध्ये सुमारे १,४०० दुबार नावे आढळली आहेत. तसेच, अकोला पश्चिम प्रभाग क्रमांक १५ मधील बूथ क्रमांक २६१ ते २७४ या केंद्रांमध्ये सुमारे १,२०० दुबार नावे असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

Suicide of Sampada Munde : संपदा मुंडेची आत्महत्या ओबीसी समाजासाठी हळहळजनक !

ही तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, शहराध्यक्ष सौरभ भगत आणि मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी संयुक्तपणे जिल्हा निवडणूक कार्यालयात सादर केली. तक्रारीसोबत निवडक दुबार नावांची यादी व संबंधित पुरावेही जोडण्यात आले आहेत.

मनसे नेत्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, या दुबार नोंदींमुळे मतदारयादीची शुद्धता धोक्यात आली असून, काही मतदारांना मतदानाचा मूलभूत अधिकार बजावता येणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊन अनियमिततेची शक्यता वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत मनसे नेत्यांनी पुढील पाच मागण्या मांडल्या आहेत:
१. दुबार नावांची तात्काळ तपासणी करून अनावश्यक नावे मतदारयादीतून वगळावीत.
२. सुधारित मतदारयादीची प्रत त्वरित उपलब्ध करून द्यावी.
३. शुद्धीकरण प्रक्रियेच्या पाठपुराव्याची माहिती पक्षांना देण्यात यावी.
४. सर्व मतदारयाद्या तांत्रिक यंत्रणेद्वारे अद्यावत कराव्यात.
५. मतदारयादी पूर्णतः शुद्ध झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत.

पंकज साबळे म्हणाले, “अकोला जिल्ह्यातील मतदारयादीतील हा घोळ निवडणूक यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. हजारो दुबार नावांमुळे खऱ्या मतदारांचा अपमान होत आहे. आम्ही पुराव्यासह तक्रार दाखल केली असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी. अन्यथा, मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील.”

Cidco Land Scam : वनविभागाचे कबुलीपत्र, रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा

तर सौरभ भगत यांनी सांगितले, “अकोला पूर्व आणि पश्चिम भागातील हे बूथ केवळ उदाहरण आहेत. प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. आयोगाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”

यंदा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार नोंदवल्याने, निवडणूक आयोगाच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.