Food and drugs supply department : गहू गायब, ज्वारीची एन्ट्री! जेवणाच्या ताटात बदलले दिवाळीचे मेनू

Government Decides to Provide Jowar Instead of Wheat in Ration Supplies : सरकारच्या निर्णयाने ‘आनंदाचा शिधा’ गायब, गरिबांची पुन्हा थट्टा

Buldhana राज्यातील रेशनधारकांसाठी यंदाची दिवाळी थाळी गव्हाऐवजी ज्वारीची भाकरी घेऊन आली आहे. सरकारने गहूऐवजी ज्वारी देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक कुटुंबांच्या सणासुदीच्या स्वयंपाकघरात बदल दिसून आला आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद झाल्याने सामान्य जनतेच्या नाराजीला अधिक खतपाणी मिळाले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धान्य खरेदी धोरणातील बदल आणि गव्हाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे सरकारने रेशनवर ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ग्रामीण भागात ज्वारीचे स्वागत होत असले तरी, शहरी भागात ‘गहू मिळत नाही’ या तक्रारींनी जोर धरला आहे.

Local Body Elections : मतदार याद्यांतील गोंधळाने प्रशासनाची धांदल!

पूर्वी दिवाळीत मिळणाऱ्या शंभर रुपयांच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत मिळणारे धान्य आणि सणासुदीचा आनंद यंदा लुप्त झाला आहे. सरकारने ही योजना बंद केल्याने सामान्य कुटुंबांना निराशा झाली आहे.

कोणाला किती ज्वारी मिळणार?

अंत्योदय गट: प्रति कुटुंब २० किलो ज्वारी

प्राधान्य गट: प्रति सदस्य ५ किलो रेशनधान्य

नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात हमीभावाने खरेदी केलेल्या ज्वारीचा पुरवठा सुरू राहील. गव्हाचा पुरवठा मात्र “उपलब्धतेनुसार” दिला जाईल, असे प्रशासनाचे स्पष्टीकरण आहे.

राज्यात यंदा उन्हाळी ज्वारीचे उत्पादन चांगले झाले. हमीभावाने झालेल्या बंपर खरेदीमुळे सरकारने ज्वारीचा साठा रेशन वितरणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे ‘गरिबांच्या ताटातील गहू’ गायब झाला आणि दिवाळीचा स्वाद बदलला, अशी जनतेत भावना आहे.

Local Body Elections : मतदारयादीत सुधारणा झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

बुलढाण्यातील लाभार्थी सुभाष तरमळे म्हणाले, “सरकारने दिवाळीच्या दोन दिवस अगोदरच रेशन वाटप केले. पण त्यातही हायब्रीड ज्वारी देण्यात आली. गहू नावालाच मिळाला नाही.”

आरोग्यदृष्ट्या ज्वारी पौष्टिक मानली जात असली, तरी सणासुदीला पुरणपोळीऐवजी ज्वारीची भाकरी खाण्याची वेळ आल्याने जनतेत नाराजीचे सूर उमटले आहेत. एकंदरीत, ‘आनंदाचा शिधा’ बंद आणि गहूऐवजी ज्वारीच्या पुरवठ्याने सरकारच्या निर्णयावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. दिवाळीत आनंदाची अपेक्षा असताना अनेकांच्या ताटात ‘ज्वारीचा वास्तववाद’ उतरल्याचे चित्र दिसत आहे.