Thousands of Plot Owners Express Anger Against the Government : मेहकरात हजारो भूखंडधारक संतप्त, एसडीओंकडे निवेदनाचा पाऊस,
Mehkar मेहकर तालुक्यातील ३९ लेआऊटच्या एनए ऑर्डर रद्द केल्याच्या निर्णयामुळे हजारो भूखंडधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पै-पै जमवून घेतलेले प्लॉट आता मातीमोल ठरत आहेत,” अशी हाक देत नागरिकांनी मेहकरच्या विद्यमान उपविभागीय (महसूल) अधिकारी रवींद्र जोगी यांना निवेदन देऊन रद्द ठरविलेले भूखंड परत करण्याची मागणी केली आहे.
तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी मागील चार महिन्यांत मेहकर शहरातील ३९ लेआउटच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणत एनए ऑर्डर रद्द केल्या होत्या. या निर्णयामुळे हजारो प्लॉटधारक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी शासनाकडून मिळालेल्या एनए आदेशांवर विश्वास ठेवून मेहनतीच्या पैशाने प्लॉट खरेदी केले. मात्र, अचानक आलेल्या रद्दबातल निर्णयाने त्यांची स्वप्ने चक्काचूर झाली आहेत.
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच रिंगणात!
“एनए ऑर्डर बघून प्लॉट घेतला, मग आमचा गुन्हा काय?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. “ज्या अधिकाऱ्यांनी नियम डावलून एनए ऑर्डर दिल्या, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आमचे प्लॉट पूर्ववत करावेत,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
२४ ऑक्टोबर रोजी आठ ते दहा भूखंडधारकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. येत्या काही दिवसांत अशा हजारो निवेदनांचा पाऊस मुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महसूल मंत्रालय, अमरावती आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Food and drugs supply department : गहू गायब, ज्वारीची एन्ट्री! जेवणाच्या ताटात बदलले दिवाळीचे मेनू
प्लॉटधारकांनी शासनाकडे थेट प्रश्न उपस्थित केला आहे —
“शासकीय चलन भरून, रीतसर खरेदीखत करून प्लॉट घेतला, तरी आमचं नुकसान का?” त्यांच्या या आर्त मागणीमुळे मेहकर तालुक्यातील प्रशासनिक कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.








