Farmers ‘Black Diwali’ in Protest Against Government : महायुती सरकारविरोधात शेतकऱ्यांची ‘काळी दिवाळी’
Malkapur राष्ट्रीय किसान ब्रिगेडचे अध्यक्ष, शेतकरी नेते व ज्येष्ठ पत्रकार लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहनावरून राज्यभर ‘काळी दिवाळी आंदोलन’ करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर मलकापूर येथे सत्ताधारी पक्षाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या बुलडाणा रोडवरील निवासस्थानासमोर किसान ब्रिगेडतर्फे झुणका-भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अॅड. साहेबराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनकर्त्यांनी “या सरकारचं करायचं काय?”, “घेतल्याशिवाय राहणार नाही!”, “जय जवान जय किसान!”, “शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे!” अशा घोषणा देत महायुती सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच रिंगणात!
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून निवडणुकीपूर्वी दिलेली कर्जमाफीची आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. आंदोलकांनी झुणका-भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध नोंदविला.
Food and drugs supply department : गहू गायब, ज्वारीची एन्ट्री! जेवणाच्या ताटात बदलले दिवाळीचे मेनू
या आंदोलनात किसान ब्रिगेडचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर शर्मा, रंजीत डोसे, रमेशसिंहदादा राजपूत, प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, बलराम बावस्कर, ज्ञानेश्वर तायडे, शरद नाफडे, ज्ञानदेव हिवाळे, राजेंद्र नाफडे, शरद मोरे, रामराव पाटील, अरुण पाटील, सचिन थारकर, उमेश नारखेडे, अरविंद महाजन, विनोद एकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते.








