Opprevelations on Shindes meeting with Modi, Shah and Delhi visit : शिंदे यांची मोदी, शहा भेट आणि दिल्ली दौऱ्यावर गौप्यस्फोट
Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सल्ल्याने शिंदे गटाला महापालिका निवडणुकीनंतर भाजपा मध्ये विलीन करावे लागेल. शिंदेंच्या दिल्ली भेटीवरुन उठलेल्या चर्चांना राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मोठा प्रत्युत्तर दिला आहे.
राऊत म्हणाले की, जेव्हा सुप्रीम कोर्टात ‘पक्ष आणि चिन्ह कुणाचं?’ या वादाची सुनावणी जवळ येते, तेव्हा शिंदे गटाच्या पाय लटपटत दिल्लीकडे वळतात. “ते रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात,” असा खोचक टोला राऊत यांनी शिंदेंवर लगावला. त्यांच्या विधानानुसार, शिंदेंना आता त्यांच्या मालकांकडे दिल्लीकडे जावे लागते; मुळची शिवसेना समजून घेण्याची त्यांना अक्कल नाही, आणि त्यामुळेच त्यांना इतिहास माहिती नाही.
राऊतांनी पुढे आरोप केला की, मोदी आणि शाह यांना शिंदेंची जमिनीवरील ताकद ठाऊक आहे आणि ते शिंदेंला आमच्या विरोधात वापरत आहेत “महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल,” असा थेट दावा त्यांनी केला. राऊत म्हणाले की शिंदे कोणत्याही कायदेशीर आधारावर सुप्रीम कोर्टात आपला बचाव व्यवस्थित करू शकणार नाहीत; असा प्रयत्न झाला तर भारतीय न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास धोक्यात येईल.
Local Body Elections : सत्ता, संघर्ष आणि रणनीतींचा खेळ,नागपूरच्या राजकारणात ताप वाढतोय!
संदर्भ म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. राऊत म्हणाले की, सुनावणीची तारीख जवळ येताच शिंदेंच्या भेटीगाठी वाढतात कधी अमित शाहांना भेट, कधी मोदींना भेट मात्र त्यामागे कोणतेही ठोस ध्येय नसल्याचे ते मानतात. राऊतांच्या मते, प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेतृत्व राज्यात असावे, आणि पक्षाची मुख्य कार्यालयेही राज्यातच असावीत; पण शिंदेंचे ‘दिल्लीवर आधारीत’ वागणे हा प्रश्न उभा करतो.
राजकीय परीघात राऊतांच्या या आरोपांमुळे सत्ता व्यवस्थेतील तंटा आणि भविष्यातील सत्ता-संघटनावर चर्चा तेजीस आलेली दिसून येते. शिंदे गटाकडून यावर काय प्रत्युत्तर येते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे तसेच सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि पुढील राजकीय हालचालींना आता राज्यभराचे लक्ष लागले आहे.
_____








