Outburst of youth : देशात रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास तरुणांचा उद्रेक अटळ !

Minister Mangal Prabhat Lodhas statement created a stir : मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याच वक्तव्याने खळबळ

Jalgaon : “देशात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत, तर भारतातही नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणे तरुणांचा उद्रेक होऊ शकतो,” असा गंभीर इशारा भाजप नेते आणि राज्याचे रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर लोढा यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे.

जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे वारे सुरू आहेत. अमेरिकेतून चीनपर्यंत आणि युरोपातही मोठ्या उद्योगसमूहांनी कामगार कपात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातही शिक्षित तरुण बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात फिरत आहेत, अशी स्थिती दिसते. देश विकसित होत असला तरीही रोजगारनिर्मितीचा वेग अपुरा असल्याने असंतोष वाढतोय, याची कबुलीच लोढा यांनी आपल्या वक्तव्यात दिली आहे.

Rane Vs Rane : आता दोन सख्या भावांचा थेट राजकीय संघर्ष !

मंगलप्रभात लोढा हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी म्हटलं “रोजगार मिळाले नाही, तर पश्चिम बंगाल, श्रीलंका आणि नेपाळप्रमाणे भारतातही तरुणांचा उद्रेक होईल. या देशांमध्ये रोजगारासाठी असंतोष वाढला आणि लोक रस्त्यावर उतरले. भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सरकारने वेळेत रोजगार उपलब्ध करून दिला नाही, तर परिस्थिती तिथेच जाईल.”

लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबतही चिंता व्यक्त केली. “औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे युवकांना योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य विकास होत नाही. यासाठी समाजाने आणि माध्यमांनीही पुढाकार घ्यावा,” असं ते म्हणाले.

Jain boarding case : अखेर जैन बोर्डिंग व्यवहार रद्द, रवींद्र धंगेकरांच्या लढ्याला यश

भाजपचे वरिष्ठ नेते असलेले मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जातात. उद्योगपती असूनही ते रोजगार निर्मितीच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, हे त्यांच्या वक्तव्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे.

त्यांच्या या इशाऱ्याने राज्य आणि देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर प्रकाशझोत पडला आहे. अनेक शिक्षित युवक नोकरीच्या प्रतीक्षेत असून, आर्थिक दबाव आणि स्पर्धेमुळे असंतोष वाढतोय. लोढा यांनी मांडलेला इशारा हा केवळ राजकीय विधान नसून, भारताच्या रोजगार स्थितीवरील गंभीर वास्तवाचे प्रतिबिंब मानले जात आहे.

Cyclone : ५५ किमी प्रतितास वेगाने राज्यावर येतंय मोठं संकट

राज्य सरकारच्या रोजगार धोरणांवर आता नवे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, लोढा यांच्या या वक्तव्याने केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना युवकांच्या अपेक्षा आणि आकांक्षांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली असल्याचे मानले जात आहे.

_____