Bachchu Kadu’s Maha Elgar will be held in Nagpur tomorrow : १८२ किलोमीटरचा प्रवास करून बुट्टीबोरीत धडकणार
Nagpur : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाच्या हमी भावासाठी, दिव्यांगांना सहा हजार रुपयांच्या मानधासाठी, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी महाएल्गार आंदोलन उद्या (२८ ऑक्टोबर) नागपुरात होणार आहे. माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. बेलोरा – आडगाव – यावली शहीद – मार्डीमार्गे वर्धा येथे मुक्काम करून एल्गार यात्रा उद्या बुट्टीबोरीत धडकणार आहे.
महाएल्गार रॅलीतील प्रत्येक ट्रॅक्टर ‘जय जवान – जय किसान’ आणि तिरंगा झेंडा फडकवत घोषणांनी गजबजणार आहे. शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार या सर्वांच्या हक्काचा हा एल्गार आहे. या रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलबंड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहघाग आहे. मेंढ्या, शेळ्या, बैलबंड्या घेऊन हे सर्व बच्चू कडुंच्या सोबत निघालेले आहेत. सोलापूरहून २० हजार भाकरी, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूर डाळ आणि इतर भागांतून हुरडा व अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था झालेली आहे. गावोगावी चिवडा बनवण्याचे काम आजही सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्र एकसंघपणे या रॅलीत उतरला असल्याचे चित्र आहे.
Outburst of youth : देशात रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास तरुणांचा उद्रेक अटळ !
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना आजतागायत दिलासा दिलेला नाही. ना कर्जमाफी ना हमी भाव, उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात – निर्यात धोरणामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात कोसळला आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव कोसळले, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव ५,३५३ असूनसुद्धा शेतकऱ्यांना फक्ते ५०० ते तीन हजार रुपयांदरम्यान विक्री करावी लागत आहे. हा कोणता आत्मनिर्भर भारत, असा सवाल करत हजारो शेतकरी या रॅलीत सहभागी झाले आहेत. हा एल्गार म्हणजे आरपारची लढाई असल्याचे बच्चू कडू यांनी रॅलीची सुरूवात करताना सांगितले.
या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नेते एकत्र झाले आहेत. यामध्ये विजय जावंधिया, वामनराव चटप, राजू शेट्टी, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, प्रकाश पोहरे, दीपक केदार, प्रशांत डिक्कर, विठ्ठलराजे पवार यांचा समावेश आहे.








