Political Activity Intensifies as Intra-Party Movements Gain Momentum : जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले; इच्छुकांची लगबग, पक्षांतर्गत हालचालींना वेग
Buldhana दिवाळीचा सण संपताच जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चैतन्य परतले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध राजकीय पक्षांचे इच्छुक आता सज्ज झाले आहेत. अनौपचारिक सूत्रांनुसार नगरपरिषद निवडणुकांपूर्वी जि. प. व पं. स. निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाभरात राजकीय बैठका, सल्लामसलती आणि गटबाजी पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एकूण ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गण असून, बुलढाणा, सिंदखेडराजा, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर, चिखली, लोणार, देऊळगावराजा, खामगाव आणि नांदुरा या नगरपरिषदांमध्ये निवडणुका होणार आहेत. यापैकी सर्व नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठी चुरस अपेक्षित आहे. नवीन मतदार याद्यांमुळे काही ठिकाणी समीकरणे बदलली असून, गोटबाजी आणि मैत्री-संबंध पुन्हा नव्याने जुळवले जात आहेत.
Jain Boarding House : भाजपचा निर्णय धार्मीक आस्था जपण्यासाठी की मतांची समीकरणे साधण्यासाठी ?
निवडणुकीची औपचारिक घोषणा न झाल्याने उमेदवारांची नावे अधिकृत नाहीत; तरीही इच्छुकांनी जनसंपर्क आणि प्रचाराची चाचपणी सुरू केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक प्रमुख पक्षातून सरासरी तीन ते चार संभाव्य उमेदवार, तर नगरसेवक पदांसाठी प्रत्येक वॉर्डात दहा-बारा नावे चर्चेत असल्याची माहिती मिळते. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरही कार्यकर्त्यांच्या बैठकींना वेग आला असून, काही ठिकाणी गट-तटांचे समीकरण नव्याने आखले जात आहे.
अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी तालुका व शहर स्तरावर गुप्त बैठकांची मालिका सुरू केली आहे. प्रमुख नेत्यांच्या गटबाजीमुळे काही ठिकाणी उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे, तर काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूरही उमटत आहेत. राजकीय रणनीती आखण्यासाठी वरिष्ठ नेते जिल्हा दौरे घेणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते.
Local body election : स्थानिक स्वराज्य निवडणुकांत विरोधकांचा सुफडासाफ करा
ग्रामीण भागात पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे मूलभूत प्रश्न अधोरेखित होत असून, शहरी मतदारांना विकास आराखडे, नागरी सुविधा व स्वच्छता मोहिमांचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे आगामी निवडणुका स्थानिक विकासाच्या अजेंड्यावर लढवल्या जातील, असा अंदाज व्यक्त होत आहे.








