Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

Complaint Filed with Assembly Speaker Against MLA : धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

Akola अकोल्यातील प्रसिद्ध समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव आणि कच्छी मेमन समाज, अकोला अध्यक्ष मोहम्मद जावेद मोहम्मद जकारिया (जावेद जकारिया) यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम अरुणकुमार जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांच्या विरोधात सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

जकारिया यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, आमदार जगताप यांनी पदाचा गैरवापर करून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

Local Body Elections : दर्यापूरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! मंदाकिनी भारसाकळे रिंगणात

जकारिया यांच्या मते, 10 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापूर येथे आयोजित “हिंदू आक्रोश मोर्चा” या कार्यक्रमात आमदार जगताप उपस्थित होते आणि वक्ता म्हणून भाषण देत होते. हे भाषण ए.बी.पी. माझा वाहिनीवर थेट प्रसारित झाले.

या भाषणादरम्यान आमदार जगताप यांनी केलेल्या विधानांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप जकारिया यांनी आपल्या अर्जात केला आहे. त्यांनी नमूद केले की, सार्वजनिक मंचावर केलेल्या या वक्तव्यामुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण झाला.

Local Body Elections : अमरावती महापालिका निवडणुका जानेवारीत?

या घटनेनंतर जकारिया यांनी 11 ऑक्टोबर 2025 रोजी रामदासपेठ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, आमदार जगताप हे प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.