NCP Politics : मी मंत्री झालो तर गडचिरोलीचा विकास वेगाने होणार !

Ajit Dada will keep his promise, Dharmaraobaba Atram still has faith in him : अजित दादा दिलेलं वचन पाळतील, धर्मरावबाबा आत्राम यांना आजही विश्वास

Nagpur : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्री बनण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मंत्रीपद देण्याचं वचन दिलं होतं आणि अजित दादा आपलं वचन पाळतील, असा विश्वास आजही धर्मरावबाबांना आहे. माझं उद्दिष्ट फक्त पद नाही, तर गडचिरोलीचा सर्वांगिण विकास आहे. मी मंत्री झालो तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असे धर्मरावबाबा म्हणाले.

यासंदर्भात नागपुरात पत्राकारांशी बोलताना धर्मरावबाबांनी सांगितलं की, मी सभा घेतोय कारण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. लोकांनी मला प्रतिसाद दिला, सभेला प्रचंड गर्दी होती. यावेळी अनेक पक्षप्रवेशही झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत असतानाच आत्राम यांनी स्पष्ट केलं की, विदर्भात नव्याने काय काय करता येईल, कोणती रणनिती आखता येईल यावर अजित दादांशी चर्चा करून पुढील राजकीय दिशा ठरवली जाईल.

Harshawardhan Sapkal : ‘गली गली मे शोर है – चुनाव आयोग चोर है’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आत्राम यांनी महायुतीच्या संदर्भातही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जेथे महायुती होईल, तेथे आम्ही एकत्रितपणे उमेदवार देऊ आणि जेथे शक्य नसेल, तेथे मैत्रीपूर्ण लढत करू. महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने विजयी करणे, हे एकच आमचे उद्दिष्ट आहे. आगामी निवडणुकांत तिन्ही पक्ष एकत्र लढून महाराष्ट्रात विकासाचं नव पर्व सुरू करेल, असा विश्वास धर्मरावबाबांनी व्यक्त केला.

Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

धर्मरावबाबांच्या उपरोक्त वक्तव्यामुळे गडचिरोलीच्या राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादातून स्थानिक जनतेचा उत्साह स्पष्ट दिसला, तर दुसरीकडे त्यांनी अजित पवारांबद्दल दाखवलेला विश्वास आणि संयम, यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या समीकरणांना बळ मिळण्याची शक्यता बळावलेली दिसत आहे. मंत्रीपदाच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास अजून संपलेला नाही, असाच संदेश धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेला आहे.