Local Body Elections : आम आदमी पार्टीचा उमेदवार ठरला, निवडणुकीसाठी थोपटले दंड!

Aam Aadmi Party Finalizes Candidate for Mayor Post : नगराध्यक्षपदावर पहिला डाव; शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर लढणार

Buldhana आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, आम आदमी पार्टीने बुलढाणा नगराध्यक्षपदासाठीचा आपला पहिला उमेदवार जाहीर करत राजकीय रंगत वाढवली आहे. बुलढाणा येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश खडके पाटील यांनी मनिषा प्रशांत मोरे यांची नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.

या वेळी डॉ. खडके पाटील म्हणाले की, “आम आदमी पार्टी ही जनतेच्या विकासाचा आराखडा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य ही आमची त्रिसूत्री असून, या विषयांवर आधारित पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हे आमचे ध्येय आहे.”

Local Body Elections : ३५ हरकती मंजूर, ९ अर्ज अमान्य; ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी

पार्टीने याच परिषदेत जाहीर केले की, केवळ बुलढाणा नव्हे तर लोणार, मेहकर आणि जळगाव जामोद येथील नगर परिषद निवडणुकांतही उमेदवार देण्यात येणार आहेत. बुलढाणा शहरातील काही नगरसेवक पदांसाठीही पक्षाने संभाव्य उमेदवारांची घोषणा केली असून, त्यामध्ये शेख इरफान शेख बुडन आणि शेख मजहर यांच्या नावांचा समावेश आहे.

Local Body Elections : मूलभूत सुविधांशिवाय विकास कसा?, नागरिकांचा सवाल

या वेळी आपचे शहराध्यक्ष प्रशांत मोरे यांच्यासह पक्षातील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर करताच बुलढाणा शहरात आम आदमी पार्टीकडून नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.