Farmers Return the Amount to the District Collector : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची थट्टा; कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना परत केली रक्कम
Akola अस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. मात्र, अकोल्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत फक्त पाच रुपये इतकी तुटपुंजी रक्कम जमा झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या रकमेची थट्टा वाटणाऱ्या शेतकऱ्यांनी ही रक्कम सरकारला परत केली.
२०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ ते २७ रुपये एवढीच भरपाई जमा झाली.
ही रक्कम अपमानास्पद असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून धनादेशाद्वारे रक्कम सरकारला परत केली.
Election commission of Maharashtra : स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट शक्यच नाही
या प्रसंगी आदित्य मुरकुटे, उमेश कराड, अविनाश नागरे, रोहित वखारे, नंदकिशोर मोडक, सुधाकर दामोदर, देवीदास गावंडे, नीलेश वाकोडे, मनोज पाचबोले, रघुनाथ कोल्हे, केशव केंद्रे आदी शेतकरी उपस्थित होते.
अकोला तालुक्यातील कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा आणि रेल गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळालेली नुकसानभरपाई पाहता शेतकऱ्यांचा रोष स्वाभाविक आहे.
अरुण राऊत यांना ₹५.०८
संदीप घुगे यांना ₹५
गणपत सांगळे यांना ₹१३
विजय केंद्रे यांना ₹१४.०७
केशव केंद्रे यांना ₹१६.१५
आदित्य मुरकुटे यांना ₹२१.८५
उमेश कराड यांना ₹२७.०५
या व्यतिरिक्त आणखी अनेक शेतकऱ्यांना अशीच तुटपुंजी रक्कम मिळाल्याचे सांगण्यात आले.
Farmers Movement : यांना कचाकच घोडे घालल्याशिवाय काही होणार नाही!
“शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नुकसानभरपाई म्हणजे केवळ आर्थिक थट्टा आहे. या रकमेच्या पैशांत तर पाव साखरही विकत घेता येणार नाही. त्यामुळे आम्ही ही रक्कम सरकारला परत केली,” असे काँग्रेस प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी सांगितले आहे.








