Illegal liquer sell : महिलांचे संसार वाचविण्यासाठी ठिय्या आंदोलन; अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार

No Police Action Despite Repeated Representations
: वारंवार निवेदनानंतरही पोलिस कारवाई नाही, लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार

Andhera गांगलगाव येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात अखेर ग्रामस्थांचा संयम संपला आहे. वारंवार निवेदने देऊनही पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. लहुजी शक्ती सेनेच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे बेमुदत आंदोलन आता गावातील जनआक्रोशाचं प्रतीक ठरत आहे.

गांगलगाव परिसरात अवैध दारू विक्री गेल्या काही महिन्यांपासून उघडपणे सुरू आहे. हाताच्या अंतरावर दारू उपलब्ध असल्याने तरुण पिढी आहारी गेली असून, अनेक घरांमध्ये कलह आणि हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूपायी महिलांना रोजच्या मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. काही कुटुंबांमध्ये तर पती नशेत घरातील भांडीकुंडी, अन्नधान्य विकून दारू मिळवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे महिलांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त होत असून, मुलांवरही मानसिक परिणाम होत आहेत.

Compensation : उध्वस्त शेतकऱ्यांना 3 ते 21 रुपयांची नुकसानभरपाई !

लहुजी शक्ती सेनेचे मुकेश खरात, गोपाल गायकवाड आणि गणेश खरात यांनी याबाबत वारंवार पोलीस ठाणे आणि प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर २९ ऑक्टोबरपासून गांगलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. “दारू विक्री बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संपर्क साधला असता अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी सांगितले की, “आम्ही ही तक्रार गांभीर्याने घेतली आहे. दररोज एक पोलीस कर्मचारी गांगलगावात गस्त घालणार आहे. कुठेही अवैध विक्री आढळल्यास नागरिकांनी मला थेट कळवावे, मी स्वतः कारवाईसाठी पोहोचेल.”

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जर यावेळीही प्रशासनाने दुर्लक्ष केले तर दारूबंदीच्या मागणीला मोठं जनआंदोलनाचं रूप दिलं जाईल. महिलांच्या संसाराचा प्रश्न असल्याने गावातील सर्व समाज घटक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

Teachers’ Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्वतयारी

दारूबंदीचा मुद्दा ग्रामीण भागात नेहमीच राजकीय ताप वाढवणारा ठरला आहे. अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले जात आहे. महिला पुढाकार घेत असल्याने या आंदोलनाला भावनिक आणि सामाजिक दोन्ही परिमाण लाभले असून, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रभाव टाकू शकतो.