Navneet Rana : माझ्याकडे 50 जणांची गँग, तुझ्यावर सामूहिक अत्याचार करून मारून टाकू!

BJP Leader Navneet Rana Receives Threat Letter from Hyderabad : भाजप नेत्या नवनीत राणा यांना हैदराबादहून धमकीचे पत्र

Amravati भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून गंभीर धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. हैदराबादमधील ‘जावेद’ असे नाव वापरून पाठवलेल्या या पत्रात, “माझ्याकडे 50 जणांची गँग आहे, तुझ्यावर गँगरेप करून मारून टाकू,” असा धक्कादायक मजकूर लिहिण्यात आला आहे. हे पत्र स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आले असून, प्रकरणाची नोंद राजापेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच नवनीत राणा यांच्या स्वकीय सहाय्यकाने पोलिस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल केली. राजापेठ पोलिसांनी सांगितले की, पत्रावर दिलेला पत्ता आणि पोस्टमार्क तपासला जात आहे. संबंधित पोस्ट ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेज, पोस्टल ट्रेसिंग आणि नोंदींच्या आधारे पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच, पत्रातील हस्ताक्षर, शाई आणि कागदाचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.

Illegal liquer sell : महिलांचे संसार वाचविण्यासाठी ठिय्या आंदोलन; अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा गुन्हा धमकी आणि भडकावणाऱ्या पत्रव्यवहाराचा प्रकार म्हणून नोंदवण्यात आला आहे. पुढील तपासात आरोपीचा प्रत्यक्ष संपर्क किंवा ठोस पुरावे मिळाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोस्टल विभागाने संयुक्त तपास सुरू केला असून, आवश्यकतेनुसार सायबर व फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

NCP Sharad Pawar : शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष बदलला, नरेश शेळकेंवर जबाबदारी

या घटनेनंतर नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली असून, पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. विविध सामाजिक व राजकीय नेत्यांनी या घटनेची निंदा केली आहे आणि कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा प्रकारच्या धमक्यांची माहिती नागरिकांनी तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.