MP Varsha Gaikwads shocking revelation : खासदार वर्षा गायकवाड यांचा धक्कादायक गौप्यस्फोट
Mumbai : राज्य हादरवणाऱ्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात आता नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, डॉक्टर महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाले असून, या प्रकरणामागे पोलीसच सहभागी असल्याचे आरोप त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला आहे आणि तो गोपाळ बदनेने केला आहे. पहिला बलात्कार 15 जून 2025 रोजी झाला, दुसरा 10 जुलै 2025 रोजी, तिसरा 5 ऑगस्ट 2025 रोजी, आणि चौथा 20 सप्टेंबर 2025 रोजी झाला. यादरम्यान तिच्यावर ब्लॅकमेल आणि धमकावण्याचा खेळ सुरू होता.”
Forged signature : थेट अजित पवारांची बनावट सही करून शिक्का मारला!
वर्षा गायकवाड यांनी पुढे सांगितले की, या काळात डॉक्टर महिलेला प्रशांत नावाच्या व्यक्तीकडून मानसिक छळ, अपमान आणि मारहाण सहन करावी लागली. “ही आत्महत्या नाही, तर नियोजित हत्या आहे,” असा दावा त्यांनी केला. “व्यवस्थेनेच तिच्या मनात अविश्वास निर्माण केला. ती एक सशक्त, आत्मनिर्भर महिला होती. पण जेव्हा पोलीसच भक्षक बनतात, तेव्हा राज्यातील महिलांचे भविष्य काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
Navneet Rana : माझ्याकडे 50 जणांची गँग, तुझ्यावर सामूहिक अत्याचार करून मारून टाकू!
या प्रकरणात वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तीव्र निशाणा साधला. “घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी मुख्यमंत्री फलटणला गेले आणि त्यांनी रणजित निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं. कोणतीच चौकशी पूर्ण झाली नव्हती, तरी क्लिन चीट कशी दिली गेली? फडणवीस साहेबांना नक्की कोणाला वाचवायचं आहे?” असा सवाल त्यांनी केला.
“डॉक्टर महिलेने वारंवार मदतीसाठी पत्र लिहिली, पण कुणीही ऐकून घेतले नाही. आरोपींना वाचवण्याची आणि क्लिन चीट देण्याची सवय सरकारला झाली आहे,” असे म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात न्यायव्यवस्थेच्या निष्क्रीय भूमिकेवरही टीका केली.
या घटनेमुळे राज्यातील प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्था यंत्रणेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी महिलांसह विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
_______








