Uddhav – Raj Thackeray meeting : भेटी मोजताहेत, आता तर मीही कंटाळलो, राज ठाकरेंचा टोला !

Counting visits, now I am also tired, says Raj Thackeray : आपल्याला मते मिळतात, पण ती चोरी केली जातात

Mumbai : उद्धव ठाकरे आणि माझी ९वी भेट झाली, ११वी भेट झाली, असं पत्रकार सतत दाखवत असतात. ते मोजत आहेत की, माझ्या आणि उद्धवच्या किती भेटी झाल्या. भेटीगाठी होतच राहणार, किती वेळा दाखवणार तेच ते, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माम सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवर विनोदी पण तेवढाच टोचणारा प्रहार केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत असलेल्या भेटींची चर्चा असतानाच भेटी होतच राहणार, त्यात काय नवीन? असे म्हणत त्यांनी या चर्चांवर पदडा टाकला.

मुंबईत आयोजित पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत पत्रकारांवर टीका केल्यानंतर सध्याच्या राजकीय आणि निवडणूक व्यवस्थेवर भाष्य केले. ‘लोक म्हणतात की, राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. खरं पाहिलं तर आम्हाला मतं मिळतात. फक्त ईव्हीएममुळे ती दुसऱ्यांना जातात’, असे म्हणत त्यांनी थेट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या घोळाकडे आणि मतचोरीकडे लक्ष वेधले.

Mumbai shook : चित्रपटात कामाचं आमिष दाखवून 17 चिमुकल्यांना डांबून ठेवलं !

पदाधिकाऱ्यांना एक डेमो दाखवून ईव्हीएमसंदर्भात असलेल्या तांत्रिक शंका राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्या. ‘अख्खा देश बोंबलतोय की मताची चोरी होते आहे. त्यामागे काहीतरी सत्यता तर असणारच’, असं राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं. निवडणूक प्रक्रियेबाबत मतदारांच्या शंका योग्य असल्याचं त्यांनी सुचित केलं. ‘आम्ही सतत सांगत आलो आहोत की मतदार याद्या स्वच्छ कराव्या. त्यात हजारो बोगस नावे आहेत. आणखी एक वर्ष निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालतील. पण मतदार यादीतील गोंधळ संपवला पाहिजे. कारण लोकशाहीत मत म्हणजेच लोकांचा आवाज आणि तो जर बिघडवला गेला, तर सगळं बिघडलंच म्हणून समजा.’, असं राज ठाकरे म्हणाले.

Satyacha morcha : मतचोरीविरोधात मनसे सह महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’

हास्य, प्रहार आणि प्रबोधन असा तिहेरी संगम असलेला त्यांचा मेळावा ठरला. त्यांची भाषणे केवळ राजकारण नव्हे, तर विचारांचा आरसा आहे, हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलं.