After Madhavis live, the two came face to face. : माधवीच्या लाईव्हनंतर दोघी आल्या आमने सामने
Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन “रुपालीं”मधला संघर्ष चांगलाच पेटला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील मतभेद आता सरळ फेसबुक लाईव्हच्या रणांगणात उतरले आहेत. माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने नुकत्याच केलेल्या लाईव्हनंतर या दोन्ही नेत्या पुन्हा आमनेसामने आल्याचं चित्र आहे.
फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आधीच राज्यभरात टीकेची झोड उठली होती. त्यात रुपाली ठोंबरे पाटील यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांची थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. त्या चर्चेदरम्यान पीडित कुटुंबीयांनी रुपाली चाकणकरांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली. यानंतर या दोन नेत्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आल्या.
Satyatacha morcha : राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली !
यानंतर पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्ह करत रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. या महिलेनं दावा केला की, रुपाली ठोंबरे यांनी गुंड पाठवून आपल्यावर अमानुष मारहाण केली. तिच्या डोक्यात जखम झाली असून, व्हिडिओमध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होती. काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र, काही दिवसांनंतर माधवी खंडाळकर यांनी अचानक यू-टर्न घेतला आणि आता या प्रकरणात नवं वळण आलं आहे.
माधवी खंडाळकर यांनी सांगितलं की, “रुपाली चाकणकर यांनी माझ्यावर दबाव आणून हा व्हिडिओ करायला लावला. हा सर्व राजकीय डाव होता.” या वक्तव्यानंतर ठोंबरे समर्थक आक्रमक झाले आणि चाकणकरांवर सोशल मीडियावर हल्लाबोल सुरू झाला. दुसरीकडे, रुपाली ठोंबरे यांनी थेट चाकणकरांवर आरोप केला की, “रुपाली चाकणकर महिलांना धमक्या देतात, दबाव टाकतात आणि त्यांच्या नावाने व्हिडिओ तयार करतात.”
Olympic Association : अध्यक्षपदासाठी अजित पवार; तीन उमेदवार बिनविरोध
माध्यमाशी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “रुपाली चाकणकरांनी यापूर्वी अनेक महिलांवर दबाव आणला आहे. पण आता हे चालणार नाही. जर लढायचंच असेल तर ग्राऊंडवर कामानिशी लढा सोशल मीडियावर नाही.”
या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतर्गत वाद पुन्हा उघडे पडले आहेत. अजित पवार गटातील रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटाशी नाळ असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्यातील हा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून, पक्षाच्या गटराजकारणाचंही प्रतिबिंब असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं.
Uddhav Thackeray : ‘सत्याच्या मोर्चा’पूर्वी उद्धव ठाकरे अडचणीत?
महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या दोन्ही महिला नेत्यांमधील हा वाद आता सोशल मीडियावरून रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीतल्या या “रुपाली विरुद्ध रुपाली” संघर्षाने राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलाच खळबळ उडवून दिली आहे.
______








