व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ladki bahan Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!

Ladki bahan Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!

A middle way to overcome ‘that’ problem of major relaxation in the eKYC process : eKYC प्रक्रियेत मोठी शिथिलता ‘त्या’ अडचणीवर मध्यम मार्ग

Mumbai: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. e-KYC प्रक्रिया अनिवार्य असली तरी तिच्यातील एक महत्त्वाची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थी महिलांचा मोठा प्रश्न सुटला असून, हजारो महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

‘लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी e-KYC प्रक्रिया बंधनकारक केली होती. त्यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांची मुदत दिली होती आणि मुदतवाढही आता या महिन्यात संपत आहे. शासनाच्या सूचनेनुसार, e-KYC पूर्ण न केल्यास पुढील हप्त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत.

Controversial statement : ‘एक वेळ आई मेली तरी चालेल’… शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य !

या प्रक्रियेत आधार कार्ड, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, बँक खात्याची माहिती आणि पती अथवा वडिलांचे आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आले होते. पण ज्या महिलांचे पती अथवा वडील हयात नाहीत, त्यांना ही माहिती देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाकडे सतत मागणी होत होती की, अशा लाभार्थ्यांसाठी वेगळा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

अखेर सरकारने या महिलांची अडचण ओळखून e-KYC प्रक्रियेत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाने दिली असून, यामुळे हजारो लाभार्थी महिलांचा जीव भांड्यात पडला आहे.

जिल्हास्तरावर यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना महिलांच्या e-KYC प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची पद्धत: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी आपल्या मोबाईल किंवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. लॉगिन केल्यानंतर “e-KYC प्रक्रिया पूर्ण करा” असा पर्याय निवडावा. त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवून Send OTP या पर्यायावर क्लिक करावे.

आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून सबमिट करावा. यानंतर पती, वडील किंवा नव्या नियमानुसार इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक भरून प्रक्रिया पूर्ण करावी. जात प्रवर्ग निवडून आवश्यक घोषणापत्रावर क्लिक करावे. संपूर्ण माहिती वाचून सबमिट केल्यावर “e-KYC पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण” असा संदेश दिसेल.

Doctor suicide case : जयकुमार गोरे कोण तीस मार खान? आधी स्वतःचं चारित्र्य बघावं!

या निर्णयामुळे पती अथवा वडील नसलेल्या महिलांना आता e-KYC प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा मिळाली असून, त्यांचा हक्काचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!