Internal rift within the Nationalist Congress Party : बॅनर प्रकरणावरून कार्यकर्त्यांत नाराजी, वरिष्ठांच्या हस्तक्षेपाची मागणी
DeoulgaoRaja राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नरेश शेळके यांच्या नियुक्तीनंतर देऊळगाव राजा शहरात लावलेल्या अभिनंदन बॅनरने अनपेक्षितपणे राजकीय वाद निर्माण केला आहे. या बॅनरमध्ये ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व डॉ. रामप्रसाद शेळके यांचा फोटो नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बॅनरवर स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असताना, डॉ. रामप्रसाद शेळके यांचा फोटो वगळल्याने पक्षातील काही गट अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत पक्षातील संवाद अभावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Local Body Elections : मान मिळाला नाही तर स्वबळावर लढू, वंचितचा इशारा
या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या देऊळगाव राजा तालुक्यातील गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेकांनी याला “अनादर” असे संबोधून वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी यास पक्षातील अंतर्गत गटबाजीचे द्योतक म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हा स्तरावरही या प्रकरणाची चर्चा रंगली असून, वरिष्ठ नेतृत्वाकडून परिस्थिती हाताळण्यासाठी तत्काळ हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, या वादावर अजूनपर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
Local Body Elections : निवडणूक जाहीर झाली, पोलीस दलात मोठे बदल!
जिल्ह्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) संघटनात्मक बळकटतेसाठी प्रयत्न करत असताना अशा प्रकारच्या अंतर्गत नाराजीतून आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता वरिष्ठ नेते कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








