Breaking

Sameer Bhujbal : समीर भुजबळांनी कुणाची पतंग कापली ?

Ex-MP Enjoyed kite flying festival : पत्नीसह लुटला उत्सवाचा आनंद; येवल्याच्या पतंगोत्सवाला हजेरी

Nashik Yeola माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. आता आपण मंत्री पण होणार, याबाबत ते बिनधास्त होते. पण ऐनवेळी अजित पवार यांनी त्यांची पतंग कापली. या घटनेला एक महिना लोटला. पण आता येवल्यातील पतंगोत्सवात भुजबळांचे सुपूत्र माजी खासदार समीर भुजबळ यांनी कुणाची पतंग कापली याचीच जास्त चर्चा होत आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने विशेष पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्नी डॉ.शेफाली भुजबळ यांच्यासोबत पतंग उत्सवात हजेरी लावली. पतंग उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी पतंग उडवीत समीर भुजबळ यांनी अनेक पतंग देखील कापले. पण ते कुणावर भारी पडले, याचीच सध्या येवल्यात चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, राजेश भांडगे, शिवसेना शहराध्यक्ष अतुल घटे, विशाल परदेशी, मलिक मेंबर यांच्याकडे भेटी दिल्या.

Nana Patole : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचाही जीव घेणार का ?

पतंग उत्सवाचा आनंद लुटतानाच समीर भूजबळ यांनी सामाजिक भान जपले. त्यांनी पतंगाच्या धाग्यामुळे जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूसही केली. पारेगाव तालुका येवला येथील दत्तात्रेय जेजुरकर यांना नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. समीर भुजबळ यांनी जेजुरकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली तब्येतीची विचारपूस केली. यावेळी समीर भुजबळ यांनी सोनवणे हॉस्पिटलचे डॉ.आर एम सोनवणे, डॉ.तेजस सोनवणे, डॉ.करिश्मा सोनवणे यांच्याशी चर्चा करत रुग्णाच्या तब्येतीची माहिती घेतली.

National Youth Day : १०८ सामूहिक सूर्यनमस्कारांनी भारावली शेगावनगरी !

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित येवला शहरात भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. यावेळी आर्की.सारंग पाटील, कंत्राटदार पंकज काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.