Nitesh Rane : राज्य अल्पसंख्यांक आयोग नितेश राणेंना नोटीस पाठवणार

Repeatedly using inflammatory language against Muslim community : मुस्लिम समाजाबद्दल वारंवार भडकावू भाषा भोवणार

Nagpur: मंत्री नितेश राणे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात मुस्लिमांना दुकानं देऊ नयेत, असं केलेलं वक्तव्य आता त्यांना अडचणीचे ठरणार असे चिन्हं आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून नितेश राणेंना नोटीस पाठवण्याची तयारी सुरू आहे.

“नितेश राणे यांच्याकडून वारंवार मुस्लिम समाजाविषयी आणि अल्पसंख्यांकांविषयी द्वेष पसरवणारी भाषा वापरली जाते. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून या वक्तव्याबाबत खुलासा मागवला जाणार आहे,” अशी माहिती राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून देण्यात आली आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनाच दुकाने असावीत, मुस्लिमांना देऊ नयेत, हे नितेश राणेंचं वैयक्तिक मत आहे. भाजप पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.”

प्यारे खान यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्व सनातनी नेते असूनही त्यांनी कधीही धार्मिक द्वेष वाढवणारी वक्तव्ये केली नाहीत. मात्र, मंत्री नितेश राणे वारंवार मुस्लिम समाजाबद्दल भडकावू भाषा बोलताना दिसतात, त्यामुळे आयोग याकडे गंभीरतेने पाहत आहे.”

BJP Politics : हंसराज अहिर यांना झटका; खंदे समर्थक प्रशांत समर्थ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले होते की, “या कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच दुकानं लावावीत. ज्यांना हिंदू धर्म, देव-देवतांची पूजा मान्य नाही, त्यांनी अशा धार्मिक सोहळ्यात व्यवसाय करू नये.” या वक्तव्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू कार्ड’ खेळण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

या वक्तव्याचं समर्थन करत नाशिकमधील काही साधू-महंतांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या असून, “कुंभमेळ्याच्या काळात हिंदू संस्कृतीचा अपमान होऊ नये, म्हणूनच सरकारने अशा वक्तव्यांना गांभीर्याने घ्यावं,” अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात याबाबत तीव्र मतभेद दिसत आहेत.

Unhen landscam case : तेव्हा… पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करू” !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच नितेश राणेंना अशा वक्तव्यांबाबत तंबी दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तरीही राणेंच्या भाषणांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून लवकरच अधिकृत नोटीस पाठवली जाण्याची शक्यता असून, नितेश राणेंना या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. दरम्यान, भाजपने या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवलं असून, “हे पक्षाचं मत नाही,” अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, धार्मिक रंग चढवणारी अशी विधानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढवू शकतात आणि भाजपला बचावात्मक भूमिकेत आणू शकतात.

______