The wounds inflicted by the name change struggle are still fresh Salute to martyred Bhim Sainiks on Name Extension Day : नामविस्तार दिनानिमित्त शहीद भीमसैनिकांना केले अभिवादन
Nagpur Dr. Nitin Raut : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. नागपूर शहरातील दहा नंबर पूल चौक इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारक येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिद भीमसैनिकांना अभिवादन केले.
नामांतर लढ्यानं दिलेले घाव आजही ताजे आहेत. भलेही जखमा भरून निघाल्या असतील. पण व्रण अजूनही कायम असल्याचे डॉ. राऊत यावेळी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिलेले आहे. नामांतर आंदोलनात शहिद भीमसैनिकांना आज डॉ. राऊत यांनी सलामी दिली. यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेम्भूर्णे, ठाकूर जग्यासी, सुरेश पाटील, निशाद इंदूरकर उपस्थित होते.
Sharad Pawar on Amit Shah : पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच
भीमसैनिकांचा त्याग मोठा..
आंबेडकरी जनतेच्या १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर अस्तित्वात आले. नामांतरासाठी झालेला अभूतपूर्व लढा व त्यात प्राणाची बाजी लावून लढलेले भीमसैनिक यांच्या त्यागामुळेच नामांतर शक्य झाले आहे. या लढ्यात शहीद भीमसैनिकांना माझा मानाचा मुजरा आहे, अशा शब्दांत डॉ. राऊत यांनी शहिद स्मारक येथे अभिवादन केले. नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
देशात आणि राज्यात संविधानाची पायमल्ली सुरु आहे. कायद्याचं राज्य मोडून काढलं जातं आहे. देशभरात ज्या अनेक गोष्टी घटनेच्या आधाराने निर्माण केल्या, त्याची पायमल्ली केली जाते आहे. आपल्या देशात संविधान वाचवण्याची नितांत गरज असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
Safety of school students at stake : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर!
परभणी आणि बीडसारख्या घटना आज समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सरपंचांनी काम कसे करावे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. या घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून असे अपराध करण्यासाठी धजावण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. दोन्ही घटनांच्या मुळापर्यंत सरकारने गेले पाहिजे. सूत्रधारांना अटक झाल्याशिवाय या प्रकरणांत न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सरकारने जातीने लक्ष देऊन ही प्रकरणे हाताळली पाहिजेत, असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.