Local Body Elections : पहिल्या दिवशी ‘ड्राय डे’! राजकीय पक्षांचे ‘वेट अँड वॉच’

Not a Single Candidate Filed Nomination on the First Day : एकाही उमेदवाराने दाखल केले नाही नामांकन

Buldhana राज्यात गाजत असलेल्या नगर परिषद निवडणुकांची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली असली, तरी बुलढाणा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी नामांकन दाखल करण्यात पूर्ण शांतता पाहायला मिळाली. नामांकनाचा पहिला दिवस ठणाठण कोरडा गेला — नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदासाठी एकाही उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला नाही. राजकीय वातावरणात सध्या स्पष्ट दिसते आहे ते म्हणजे “वेट अँड वॉच!”

जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आज, सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरु झाली. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाइट्स उघडल्या गेल्या; मात्र दिवसभरात एकही उमेदवाराने लॉग इन न केल्याने संगणकांच्या कीबोर्डनाही विश्रांती मिळाली.

Health Department of Maharashtra : रेफर टू बुलढाणा रुग्णालय! शिवसेनेकडून उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण

नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्थांची नेतृत्व घडविणारी शाळा मानली जाते. बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनीही ३५ वर्षे नगरसेवक म्हणून कारकीर्द केली होती. अनेक नवे नेते नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणात झळकतात, त्यामुळे या निवडणुकांना प्रचंड महत्त्व आहे.

मात्र यंदा काही ठिकाणी आरक्षण बदलल्याने अनेकांच्या गोटात गोंधळ निर्माण झाला असून, राजकीय गणिते अजून जुळवाजुळवीच्या टप्प्यातच आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी – दोन्ही गटांतील स्थानिक पातळीवर अजून उमेदवारीबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी अर्ज दाखल न होणे हे अपेक्षितच होते.

Local Body Elections : कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र! नव्या आघाडीच्या चर्चांना वेग

अमानत रकमेचे निकष:
‘अ’ वर्ग नगरपरिषदेतील सर्वसाधारण उमेदवार : ₹3000
राखीव व महिला उमेदवार : ₹1500
‘ब’ वर्ग नगरपरिषदेतील सर्वसाधारण उमेदवार : ₹2000
राखीव व महिला उमेदवार : ₹1000
‘क’ वर्ग नगरपरिषदेतील सर्वसाधारण उमेदवार : ₹1000
राखीव व महिला उमेदवार : ₹500