Yuva Swabhimani Party Proposes a Friendly Alliance with the BJP : अमरावतीत रवी राणा यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक; निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा
Amravati नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची कोअर कमिटी बैठक आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे पार पडली. बैठकीत भाजपाशी मैत्रीपूर्ण युती करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, युती न झाल्यास सर्व जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करून पक्ष आपली ताकद दाखवेल, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते नाना आमले यांनी सांगितले की, “भाजप हा आमचा मोठा भाऊ असून, शक्यतो युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु युती न झाल्यास सन्मानपूर्वक सर्व जागांवर युवा स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढेल.”
या बैठकीत सुनील राणा, जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, ॲड. नंदेश अंबाडकर, विनोद जायलवाल, प्रा. अजय गाडे, समाधान वानखडे, डॉ. आशिष मालू, कमल किशोर मालानी, ज्योती सैरीसे, सोनाली नवले, सुमती ढोके, संजय हिंगासपुरे, शिवदास घुले, गणेशदास गायकवाड, सुखदेव तरडेजा, हरीश चरपे, बाळू इंगाले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड, प्रचार नियोजन, मतदार संपर्क आणि संघटन बळकटीकरण या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Girl for marriage : मला पत्नी मिळवून द्या… तुमचे उपकार विसरणार नाही
“युती झाली तर मैत्रीपूर्णरित्या लढू, अन्यथा युवा स्वाभिमान पक्ष सर्वत्र आपली संघटनात्मक ताकद दाखवेल,” असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अंतिम निर्णय आमदार रवी राणा घेतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.








