Sharad Pawar : साहेब, एकटेपण सहन होत नाही, पत्नी मिळवून द्या!

Young Man Writes to Sharad Pawar Saying He Can’t Bear Loneliness : अकोला जिल्ह्यातील युवकाने शरद पवार यांना लिहिले पत्र

Akola राज्यातील ग्रामीण भागात लग्नासाठी योग्य मुली न मिळण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक तरुणांची वये ओलांडत असून, त्यांचे संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. या समस्येवर स्थानिक पातळीवर उपाय न सापडल्याने आता काही तरुण थेट राष्ट्रीय नेत्यांकडे साकडे घालू लागले आहेत. अकोल्यातील एका तरुणाने नुकतेच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र पाठवून भावनिक विनंती केली, ‘माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. जीवनदान द्या! मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही.’

अकोल्यात झालेल्या शरद पवार यांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान हे पत्र युवकाने दिले. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर निवेदने दिली जात असताना या तरुणाचे पत्र पाहून पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही क्षण स्तब्ध झाले. नंतर पवार यांनी हे पत्र मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखविले. तिघांमध्ये या पत्रावरून गंभीर चर्चा झाली.

Ravi Rana : भाजपाशी मैत्रीपूर्ण युतीचा प्रस्ताव; फेटाळल्यास सर्व जागांवर स्वतंत्र लढत

या तरुणाने आपल्या निवेदनात लिहिले आहे, ‘माझं वय वाढतंय. भविष्यात मी एकटाच राहीन, हे पाहून मला भीती वाटते. कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला तयार आहे. संसार नीट चालवण्याची हमी देतो.’ शेवटी त्याने लिहिले आहे, ‘मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.’

हे पत्र केवळ एका व्यक्तीचे आर्त मनोगत नसून ग्रामीण भागातील तरुणांच्या वाढत्या एकाकीपणाचे प्रतिबिंब आहे. शिक्षणातील मर्यादा, बेरोजगारी, आर्थिक असमानता आणि सामाजिक अपेक्षा यांच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुणांचा हा आवाज आहे. विवाह आणि संसाराचे स्वप्न अनेकांच्या नशिबात उरलेले नाही, परिणामी असह्य एकटेपणा आणि व्यसनांकडे झुकाव वाढत आहे.

Amol Mitkari : अंजली दमानिया सुपारीबाज समाजसेवक!

ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक रचना मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. तीन-चार दशकांपूर्वी शिक्षण, नोकरी आणि संसार हे तरुणांचे ठराविक जीवनचक्र होते. मात्र, बदलत्या काळात मुलामुलींच्या लिंग गुणोत्तरात असंतुलन वाढले. मुलींच्या अपेक्षा वाढल्या; शहरी किंवा नोकरी करणारा जोडीदार हवासा वाटू लागला. परिणामी, नोकरी नसलेले तरुण लग्नासाठी नकाराला सामोरे जात आहेत. विवाहसंस्थेवर संकट आले असून नवी सामाजिक विषमता निर्माण झाली आहे.