Local Body Elections : निवडणुकीचा प्रचार चिन्हांच्या लढतीने रंगणार भन्नाट!

Caste vs. robot, Dal vs. mouse, Gramophone vs. CCTV : जातं विरुद्ध रोबोट, डाल विरुद्ध माऊस, ग्रामोफोन विरुद्ध सीसीटिव्ही

Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता फक्त मतांसाठी नव्हे तर “चिन्हांमुळे”ही रंगणार आहेत! कारण या वेळच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना मिळालेली चिन्हे अशी आहेत की ऐकूनच हसू येईल आणि मतदान केंद्रावर नावापेक्षा चिन्हच लक्षात राहील!

धान्य दळणारं जातं विरुद्ध अत्याधुनिक रोबोट, जुन्या काळचं ग्रामोफोन विरुद्ध डिजिटल युगातील सीसीटिव्ही, पारंपारिक डाल विरुद्ध संगणकातील माऊस, अशा इतिहास व तंत्रज्ञानाच्या युगातल्या वस्तूंची भिडंत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी परिशिष्ट ‘ड’ मधून जारी झालेल्या यादीत तब्बल १६५ पेक्षा जास्त चिन्हांचा समावेश आहे. ग्रामीण जीवनाशी निगडित वस्तूंपासून ते आधुनिक काळातील तंत्रज्ञानाची प्रतीके असं भन्नाट मिश्रण या यादीत दिसत आहे.

Amul mitkari : प्रवक्तेपदावरून हटवलेले अमोल मिटकरी आता राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक!

न्हे म्हणजे फणस, कणीस, ऊस, द्राक्ष, मका, मिरची, ढोबळी मिरची, फुलकोबी, लसूण, सफरचंद, पेरू, अननस, कलिंगड आता या फळभाज्यांच्या स्पर्धेत कोणाची चव जास्त, कोण तिखट, कोण गोड, हे मतदार ठरवतील!

स्वयंपाकघराच्याही वस्तूंना राजकीय करंट लागलाय. पोळपाट, भाजणीपात्र, गॅस सिलिंडर, चमचा, कढई, खलबत्ता, कपबशी, टोस्टर, ब्रेड, बिस्किट आता एखादा “मिरची चिन्हधारी” उमेदवार म्हणणार, “माझ्याशिवाय भाजीला झणझणीतपणा नाही!” तर “लसूण चिन्हधारी” उमेदवार म्हणेल, “मीच तडक्याचा राजा!”

Ajit Pawar : ‘वर्षा’ बैठकीत अजित पवार संतप्त, सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा !

काही उमेदवार तर “ब्रश-पेस्ट” कॉम्बोवरही प्रचार करणार आहेत. कारण चिन्हांची यादीत टुथब्रश आणि पेस्ट आहेच! त्यामुळे “पेस्टशिवाय ब्रश अधुरा” किंवा “कंगव्याशिवाय भांग नाही” अशा घोषणांनी मतदारांची करमणूक होणार हे निश्चित.

क्रीडा प्रेमींसाठीही मजा आहे बुद्धिबळ पट, कॅरम, बॅडमिंटनचं फूल, फुटबॉल, डंबेल्स, बॅट अशा क्रीडा-चिन्हांनी मैदान सजलं आहे. तर संगीतप्रेमींना भेटणार गिटार, बासरी, हेडफोन, आणि बांधकामप्रेमींना मिळालंय ट्रॅक्टर, हायवा, टाइपरायटर असं तंत्रज्ञानाचं प्रतिनिधित्व करणारं चिन्ह.

Local Body Elections : भाजपला रोखण्यासाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी !

एकूणच, या निवडणुकीत मतदारांना प्रचारमधील भाषणांइतकाच “चिन्हांचा तमाशा”ही रंगतदार दिसणार आहे. काही चिन्हं जुन्या काळाची आठवण करून देतील, तर काही “नव्या युगाचं डिजिटल दर्शन” घडवतील.

म्हणजेच, या निवडणुकीत मतदार फक्त उमेदवारांमधून नव्हे तर जातं-रोबोट, डाल-माऊस, फणस-कणीस, ग्रामोफोन-सीसीटिव्ही अशा अद्भुत “कॉम्बो”मधून आपली निवड करणार आहेत!

_____