व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ravi Rana : ‘प्रहार’च्या बालेकिल्ल्यात राणांची ‘चाय पे चर्चा’

Ravi Rana : ‘प्रहार’च्या बालेकिल्ल्यात राणांची ‘चाय पे चर्चा’

Interacting with Party Workers Over a Cup of Tea at a Roadside Stall in Chandurbazar : चांदूरबाजारमध्ये टपरीवर चहा पिताना कार्यकर्त्यांशी संवाद

Amravati राज्यातील चर्चित वैर असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव करून बच्चू कडू यांनी दाखवलेली ताकद, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अचलपूरमध्ये राणांनी घेतलेला राजकीय ‘सूड’, हे या दोघांमधील वैर सर्वपरिचित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी गुरुवारी ग्रामीण भागाचा दौरा केला. चांदूर बाजारातील भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते एका टपरीवर थांबून चहाचा आस्वाद घेत अनेकांशी गप्पा मारत होते.

Khamgao APMC : खामगाव बाजार समिती सभापतींच्या विरोधातातील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा!

नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांबाबत स्थानिकांशी चर्चा करताना रवी राणांची ही ‘चाय पे चर्चा’ विशेष ठरली. ‘प्रहार’चा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात राणा यांचा हा दौरा आणि निवडणुकीपूर्व चर्चा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

Local Body Elections : सिंदखेडराजात तिरंगी लढत, युती-आघाडी आजमावणार नशीब!

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने अचलपूर आणि चांदुर बाजार या दोन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवले आहे. नगरपरिषद असो अथवा पंचायत समिती या ठिकाणी प्रहारचा जोर राहिला आहे. हेच वर्चस्व संपुष्टात आणून बच्चू कडू यांचे राजकीय बळ कमी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने आमदार रवी राणा करताना दिसून येत आहे. त्याला आता बच्चू कडू कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणे तेवढेच उत्सुकतेचे असेल.

error: Content is protected !!