Adsad Father–Son Duo sacrificed Their Positions : धामणगाव नगरपरिषदेत अडसड पिता-पुत्रांनी सोडली खुर्ची
Amravati सत्ता मिळाल्यानंतर खुर्ची सोडणे सर्वांसाठी कठीण असते. मात्र, धामणगाव नगरपरिषदेत जनसंघाचे पहिले नगराध्यक्ष दादाराव अडसड आणि भाजपचे पहिले नगराध्यक्ष अरुण अडसड या पिता-पुत्रांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच नगराध्यक्षपदाचा स्वेच्छेने त्याग करून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.
धामणगाव नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष काँग्रेसचे बालकिसन मुंधडा होते. त्यानंतर नगराध्यक्षपदावर काँग्रेस, जनसंघ, काँग्रेस आणि नंतर भाजप अशा क्रमाने सत्ता आली. काँग्रेसचे सुगणचंद लुणावत नगराध्यक्ष झाल्यानंतर थेट आमदार झाले, तर शुभकरण सराफ यांनी सलग सात वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले.
Khamgao APMC : खामगाव बाजार समिती सभापतींच्या विरोधातातील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा!
१९६० मध्ये जनसंघाने राज्यातील केवळ दोन नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळविली होती, त्यापैकी धामणगाव एक होते. त्या काळात दादाराव अडसड हे थेट नगरसेवक पदावरून निवडून आलेले नगराध्यक्ष ठरले. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सात वर्षांचा असतानाही त्यांनी साडेतीन वर्षांनंतर पदाचा राजीनामा देत उर्वरित कालावधीसाठी गणपतदादा पोळ यांना जबाबदारी दिली.
१९८० मध्ये धामणगाव नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर अरुण अडसड हे नगराध्यक्ष झाले. त्यांनीही अडीच वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर स्वेच्छेने पदत्याग करून उर्वरित कालावधीसाठी सत्यनारायण मुंधडा यांना पद दिले.
Local Body Elections : सिंदखेडराजात तिरंगी लढत, युती-आघाडी आजमावणार नशीब!
मागील निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव होते. त्यामुळे अरुण अडसड यांच्या पत्नी प्रतीभा अडसड यांना नगराध्यक्षपदाची संधी चालून आली होती. वडील, मुलगा आणि सून या तिघांनाही नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी असतानाही, अडसड कुटुंबाने परंपरेप्रमाणे त्यागाचा आदर्श ठेवत उर्मिला बोरुंदिया यांना नगराध्यक्षपदी बसविले.








