Local Body Elections : सावनेरातील चार नगरपरिषदा ठरणार देशमुख आणि केदारांच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी !

The four municipal councils in Saonera will be a test of Ashish Deshmukh and Sunil Kedar’s political survival : सावनेरचे तापलेले रणांगण, देशमुखांची वाढलेली ताकद अन् गळून पडलेली पकड परत मिळवण्याची केदारांची धडपड

Nagpur : सावनेर विधानसभा मतदारसंघातील खापा, सावनेर, मोहपा आणि कळमेश्वर-ब्राम्हणी या चार नगरपरिषदांवर सत्ता मिळवण्याची लढाई आता केवळ भाजप-काँग्रेसची राहिलेली नाही; तर ती दोन व्यक्तींच्या राजकीय अस्तित्व, अहंकार आणि वर्चस्वाच्या युद्धात परिवर्तित झाली आहे. विद्यमान आमदार डॉ. आशिष देशमुख आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यातून विस्तवही जात नाही. अन् ाता ही परिस्थिती इतकी तीव्र झाली आहे की या निवडणुका मतदारसंघाच्या सीमेतल्या सर्वात तापलेल्या स्पर्धेत बदलल्या आहेत.

कधीकाळी सावनेरच्या राजकारणात निर्विवाद वर्चस्व असलेल्या सुनील केदार यांनी इथे डॉ. आशिष देशमुख यांचे वडील, माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांना पराभूत करत आपली ताकद दाखवली होती. पण काळ बदलला. मागच्या निवडणुकीतच आशिष देशमुख यांनी त्यांच्या पत्नीचा पराभव करून केदारांच्या अभेद्य किल्ल्यावर पहिले मोठा भगदाड पाडले. त्यानंतर केदारांची पकड कमकुवत होत गेली, कार्यकर्त्यांचा ओघ कमी झाला, आणि त्यांच्या राजकीय पंखांची कातरणी झाली.

Dr. Mohan Bhagwat : सनातन तत्वज्ञान हे एकात्मिक मानवतेचे तत्वज्ञान !

मागील काळात नगरपरिषदांवर सत्ता नसली तरी केदारांना दुःख नव्हते. कारण तेव्हा ते मंत्री होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. केदारांचे मंत्रीपद गेले, आमदारकीही गेली. सत्ता नसलेला नेता म्हणजे फक्त एक आठवण, हे सत्य केदारांनाही कळले आहे. त्यामुळे या चार नगरपरिषदांवर पुन्हा सत्तेचे झेंडे फडकवणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे, अस्तित्वाचे आणि पुनरुत्थानाचे युद्ध बनले आहे.

विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी केदारांना धक्का देत मतदारसंघातील सत्ता समीकरणे उलटी केली. आता केदारांचा प्रभाव पूर्णतः शून्य करणे, हे देशमुखांचे लक्ष्य स्पष्ट आहे. केदारांचा प्रभाव पूर्णतः संपवून सावनेरवर एकहाती नियंत्रण प्रस्थापित करणे, हे त्यांचे पुढचे उद्दिष्ट आहे. यासाठी ते चारही नगरपरिषदांमध्ये भाजपच्या विजयासाठी स्वतः मैदानात आहेत. त्यांची संघटनशैली, तरुण कार्यकर्त्यांवरील प्रभाव आणि आक्रमक राजकीय मोहीम यांमुळे हवामान सध्या देशमुखांच्या बाजूने दिसते आहे.

Devendra Fadanvis : लॉजिस्टिक, महामार्ग, बंदर आणि विमानतळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

दोन्ही नेत्यांसाठी ‘करो या मरो’..
मागील नगरपरिषदांमध्ये खापा, सावनेर आणि कळमेश्वरवर भाजपचा नगराध्यक्ष होता, तर मोहप्यात काँग्रेसकडे सत्ता होती. यावेळी मात्र परिस्थिती उलटली आहे. केदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी या चारही ठिकाणी सत्ता मिळवणे त्यांच्यासाठी आवश्यक बनले आहे. तर देशमुखांसाठी या विजयाचा अर्थ आहे केदारांची पूर्ण राजकीय एक्झिट.

Birth anniversary of Lord Birsa Munda : बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी प्रगतीची नवी पायरी: चार प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण !

यावेळी सावनेरमध्ये निवडणूक नाही, तर राजकीय युद्धच होणार आहे. यावेळी सावनेरमध्ये केवळ सत्ता नाही, तर स्वाभिमान आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या स्पर्धेचा निर्णायक टप्पा आहे. आशिष देशमुख विरूद्ध सुनील केदार या लढाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. हा सामना तापलेलाच नव्हे, तर मतदारसंघातील पुढील दशकाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. लढत फक्त जोरदार नाही, तर अतिरेकाची असणार आहे, हे निश्र्चित.