Controversy over the signboard of the Islamic Information Center : खासदार बोंडे यांना हैदराबादहून धमकीवजा ई-मेल
Amravati अमरावतीमध्ये तीन दिवसांपूर्वी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लावल्याचे प्रकरण उघड झाले होते. या फलकांविरोधात आवाज उठवल्यानंतर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना हैदराबादहून धमकीवजा ई-मेल प्राप्त झाला आहे. मुख्य चौकांमध्ये इस्लामच्या प्रचाराचे फलक कसे लागले, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला होता. त्यानंतर शनिवारी रात्री आलेल्या या धमकीच्या मेलबाबत बोंडे यांच्या कार्यालयाकडून राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.
‘अस्सलामअलेकुम डॉ. साहेब’ अशी सुरुवात असलेल्या या मेलमध्ये म्हटले आहे की, इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे हैदराबादमधील मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “आपल्या बोलण्याने आमच्या मजहबी गैरतला जेवढा धक्का पोहोचला, तो राग आता लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. वृद्ध, तरुण, युवक, कुणाच्याही मनावर ताबा राहिलेला नाही,” असे मेलमध्ये नमूद आहे.
Local Body Elections : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती मैदानात!
पुढे लिहिले आहे, “डॉ. साहेब, ही सामान्य नाराजी नाही. एका ठिणगीवर वणवा पेटेल असा हा राग आहे. आपण आमच्या ओळखीवर, आमच्या दिन-तारीख आणि तालीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस केले, त्यामुळे समुदायाच्या भावना खोलवर जखमी झाल्या आहेत. आपल्या वक्तव्यामुळे हैदराबादच्या महोल्ल्यांमध्ये बेचैनी आणि अस्वस्थता निर्माण झाली असून लोक आपला राग लपवू शकत नाहीत.”
Sharad Pawar : शरद पवारांचा परफेक्ट ‘पंच’! शिलेदार मिळाले महत्त्वाचे पद
मेलच्या शेवटी असेही चेतावणीपर शब्द आहेत, “आपल्या जिभेवर आणि विधानांवर संयम ठेवा. कारण यावेळी परिस्थिती आवरणे कठीण झाले आहे. एक चुकीचा शब्दही वातावरण बिघडवण्यासाठी पुरेसा आहे.” मेलच्या अखेरीस ‘हैदराबादची नाराज मुस्लिम बिरादरी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.








