Patients are suffering in the Super Specialty Hospital : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण?, आमदाराचा आरोप
Akola शहरातील आरोग्यव्यवस्थेचे चित्र दिवसेंदिवस बिकट होत असतानाच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संभाव्य खाजगीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, डॉक्टर वेळेवर न येणे, रुग्णांची होत असलेली हेळसांड या तक्रारींची मालिका वाढत आहे. अळ्यात आमदारांनी अचानक भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.
आकस्मिक भेटीदरम्यान अनेक डॉक्टर रजा नसूनही हजर नसल्याचे उघड झाले. कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असूनही ती धूळ खात पडलेली आहेत. जनसेवेत उपयोगात आणली जात नाहीत. यावर आमदार साजीद खान पठाण यांनी संताप व्यक्त केला. आरोग्यसेवा पुरवणाऱ्या महत्त्वाच्या रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर अनियमितता कशा काय घडू शकतात? असा सवाल त्यांनी प्रशासनाला चोपला.
Municipal Council Elections : धुळ्यात दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपा नगराध्यक्ष बिनविरोध
या सर्व अनियमिततेबाबत त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, ते मुंबईतील एका बैठकीसाठी गेले असल्याचे समोर आले. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कंत्राट खाजगी कंपनीकडे देण्याच्या संदर्भात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. त्यावर “सरकार मागच्या दाराने रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा डाव रचत आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.








