Local Body Elections : शरद पवार गटाची एमआयएमसोबत आघाडी?

alliance between the Sharad Pawar faction and the AIMIM possible : अकोला मनपा निवडणुकीत आघाड्यांच्या चर्चेला वेग

Akola मनपाच्या प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता अकोला महापालिका निवडणुकीसंदर्भातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (राकाँ–शरद पवार गट) आणि एमआयएम यांच्यात आघाडीबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असेही मानले जात आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या चर्चांपासून सध्या स्वतःला दूर ठेवले आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी किंवा राकाँ–शरद पवार गटाशी आघाडीबाबत चर्चा शक्य असल्याचे काँग्रेसचे संकेत आहेत. अल्पसंख्यांक मतांचे विभाजन टाळण्यासाठी राकाँकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु राकाँ–एमआयएम आघाडी झाली आणि काँग्रेस स्वतंत्र लढली, तर मतविभाजनाचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

MLA Sajid Khan Pathan : डॉक्टर वेळेत येत नाहीत, कर्मचारी उपस्थित नाहीत, रुग्णांचे हाल

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फाट्यांमुळे राजकीय समीकरणे बदलली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिममधील भाजपचा पराभव झाला होता. आता महापालिका निवडणुकीची चाहूल लागली असून, प्रभाग आरक्षण निश्चित झाले आहे.

नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका सुरु असताना प्रमुख पक्ष बहुतेक ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी सोयीनुसार आघाड्या करत आहेत. त्यामुळे अकोला महापालिकेतही आघाडी-युती होणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून लवकरच चित्र स्पष्ट होईल.

Municipal Council Elections : धुळ्यात दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपा नगराध्यक्ष बिनविरोध

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मनपात सर्वाधिक सदस्य असलेल्या अकोला पश्चिममध्ये राजकीय परिस्थिती बदलली आहे. मनपातील ४८ सदस्य या भागातून निवडले जातात. गेली ३० वर्षे बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे २०१९ मधील जवळपास पावणेतीन लाखांचे मताधिक्य यावेळी फक्त ४० हजारांवर आले. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी विधानसभेतील विजयात राकाँचाही वाटा असल्याचा दावा राकाँ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

राकाँ–एमआयएम आघाडी झाली आणि काँग्रेस स्वतंत्र लढली, तर तिरंगी किंवा चौरंगी लढती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Pune land scam : पार्थ पवारांना क्लिन चिट नाही, सीडीआर मागवण्याची मागणी!

शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट उदयास आल्यानंतरची ही पहिलीच मनपा निवडणूक असल्याने या पक्षांच्या विस्तारावरही लक्ष आहे. घटक पक्षांतील जागावाटपासंदर्भात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

सन २०१७ च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ८० पैकी ४८ जागा जिंकत सत्ता स्थापली होती. इतरांमध्ये काँग्रेस–१३, शिवसेना–८, राष्ट्रवादी काँग्रेस–५, वंचित–३, एमआयएम–१ आणि दोन अपक्ष विजयी झाले होते. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकाँ आणि शिवसेनेची कसोटी लागणार आहे.