व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Election : रवी–नवनीत राणांना भाजपच फेकून देईल, यशोमती ठाकूर कडाडल्या...

Local Body Election : रवी–नवनीत राणांना भाजपच फेकून देईल, यशोमती ठाकूर कडाडल्या !

BJP will throw out Ravi-Navneet Rana, Yashomati Thakur says : फडणवीसांवर दादागिरी, पैशांचे आमिष आणि उमेदवारांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप

Amravati : चिखलदरा नगर परिषद निवडणुकीने पुन्हा एकदा अमरावतीच्या राणा–ठाकूर वादाला उकळी आणली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अप्रत्यक्ष नव्हे तर थेट हल्ला चढवत रवी आणि नवनीत राणा यांच्यावर, तसेच भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. ‘यशोमती ठाकूर सहा महिन्यांत भाजपमध्ये येतील’, या रवी राणा यांनी केलेल्या विधानाचा ठाकूर यांनी खरपूस समाचार घेतला.

यासंदर्भात यशोमती ठाकूर म्हणाल्या, मी भाजपमध्ये जाणार नाही, उलट रवी आणि नवनीत राणांनाच भाजप एक दिवस फेकून देईल. वापरून फेकून देण्याची पद्धत भाजपमध्ये सर्वपरिचित आहे. यावेळी ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट निशाणा साधला. चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री स्वतः दादागिरी करून, पैशांचे आमिष दाखवून आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून उमेदवारांवर दबाव आणत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Mohan Bhagwat : बंधुता हा भारताचा खरा धर्म; सरसंघचालकांचा आदिवासी नेतृत्वाशी संवाद !

फडणवीसांच्या नजरा चिखलदऱ्यातील मौल्यवान जमिनींवर आहेत आणि निवडणुकीतील ढवळाढवळ त्याच उद्देशासाठी केली जात आहे, असा आणखी एक गंभीर आरोप करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, चिखलदऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये झाली आहेत. या सगळ्या कारभाराचा एकमेव उद्देश आल्हाद कलोतींसाठी मार्ग मोकळा करणे हा आहे, असे त्या म्हणाल्या.

Minority Rights Day : १८ डिसेंबरला ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ राज्यभर होणार साजरा !

राणा–ठाकूर वाद अनेक वर्षे अमरावती राजकारणात ठळक राहिला आहे. मात्र चिखलदरा नगर परिषदेची निवडणूक लागल्यापासून या संघर्षाला पुन्हा उकळी फुटली आहे. राणांच्या विधानाने राजकीय वातावरणात चुरस तर आलीच, परंतु ठाकूर यांनी केलेले स्फोटक आरोप निवडणूक राजकारणाला वेगळी रंगत देत आहेत. काँग्रेस विरुद्ध भाजप वादात राणा जोडगोळी आणि आरोपांच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री आहेत. चिखलदऱ्याची निवडणूक अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात स्फोटक ठरली आहे.

error: Content is protected !!