Local Body Elections : कामठी–मौद्यात ‘महा-ट्युनिंग’चा खेळ ! बावनकुळे आणि अजित पवारांची जुळवाजुळव चर्चेत !

‘Maha-Tuning’ game in Kamathi-Mauda Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar’s matchmaking is in the news : मुस्लीमबहुल भागात भाजपला थेट उमेदवार न देण्यामागे बारकाईचा राजकीय डाव

Nagpur : कामठी–मौदा मतदारसंघात महायुतीची ‘खरी एकजूट’ प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यातील समन्वय आणि रणनीती आता उघडपणे चर्चेत येऊ लागली आहे. हा परिसर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जातो, तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीतील प्रमुख चेहरा. दोघांच्या संयुक्त राजकीय हालचालींनी स्थानिक राजकारणात चांगला संदेश दिला आहे.

कामठीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून साजा सेठ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. हा निर्णय केवळ उमेदवारी नसून भाजपला मिळालेली अप्रत्यक्ष राजकीय चाल म्हणूनही पाहिला जात आहे. कारण कामठी हे मुस्लीमबहुल शहर असून, अशा भागात भाजपचा उमेदवार थेट उतरवला असता, तर मत संघटनात अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘ट्युनिंग’ साधत राष्ट्रवादीचा उमेदवार पुढे करून भाजपने आपली राजकीय जमीन सुरक्षित ठेवली आहे, अशी चर्चा आहे.

Local Body Election : रवी–नवनीत राणांना भाजपच फेकून देईल, यशोमती ठाकूर कडाडल्या !

यामुळे काँग्रेसचे शकुर नागाणी यांचे नुकसान होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. भाजपला थेट उमेदवार न देता राष्ट्रवादीमार्फत ही लढत हाताळण्याची रणनीती हा महायुतीचा ‘कुशल राजकीय प्रयोग’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मौद्यातही अगदी असाच राजकीय पॅटर्न दिसून आला. नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सांगडीकर यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि थेट भाजपच्या बाजूला उभे राहिले. कामठी–मौदा या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप एकत्र येऊन केलेल्या डावपेचामुळे दोन्ही पक्षांचे ‘ट्युनिंग’ परिपूर्ण असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Mohan Bhagwat : बंधुता हा भारताचा खरा धर्म; सरसंघचालकांचा आदिवासी नेतृत्वाशी संवाद !

राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ही युती केवळ मैत्रीपूर्ण नाही, तर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आखलेली मोठी राजकीय रणनीती असू शकते. एकंदरित, कामठी–मौद्यातील या हालचालींनी महायुतीतील गुप्त पण प्रभावी गणिते उघड झाली आहेत. पुढील काही दिवसांत या जुळवाजुळवीचा व्यापक राजकीय परिणाम दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सर्वत्र फाटाफूट झालेली असताना कामठी-मौद्यात मात्र महायुती घट्ट राहिलेली आहे.