Jain Munni Nileshchandra warning to Raj Thackeray : जैन मुन्नी निलेशचंद्र यांचा राज ठाकरेंना इशारा
Mumbai : दादरच्या कबूतरखान्यावरून सुरू असलेल्या वादाला आज मोठं वळण मिळालं आहे. “तुम्ही चालू करा मग आम्ही पण चालू करू… आम्ही आता सहन करणार नाही” असा थेट आणि इशारत्मक संदेश जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे.
कबूतरखान्याच्या संरक्षणासाठी त्यांनी आता जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली असून, “जोपर्यंत दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री हटत नाही आणि दोन तास खाद्य टाकण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत जैन समाज कोणालाही मतदान करणार नाही” असा इशाराही त्यांनी दिला.
निलेशचंद्र म्हणाले, “महाराष्ट्रात जर कुठे अडचण आली तर जैन समाज पहिला उभा राहतो. सर्वाधिक आर्थिक मदतही जैन समाजाकडूनच होते. पण आमचा सन्मान झाला पाहिजे. आता प्रत्येक इमारतीत जाऊन पशू-प्राण्यांसाठी जनजागृती करणार. प्रत्येक वॉर्डात ‘कबूतर रक्षक’ तयार करणार.”
त्यांनी भाषावादावरही प्रतिक्रिया देताना म्हटलं “मराठी आणि मारवाडीला एकमेकांविरोधात उभं केलं जात आहे. हा भाषावाद फक्त राज ठाकरेच संपवू शकतात. प्रत्येक घरावर ‘जय महाराष्ट्र’ व ‘जय जिनेंद्र’ हे दोन्ही घोष कायम राहतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे फोटोही असतील.”
केंद्र व राज्य सरकारने कबुतरांना दोन तास खाद्य टाकण्याची परवानगी दिली, पण दादर कबूतरखान्याला ती लागू होत नाही यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आई राजस्थान असली तरी मोठी आई महाराष्ट्र आहे. आम्ही दिलंय तेवढंच महाराष्ट्राला दिलं आहे,” असे ते म्हणाले.
Nagpur Winter Session 2025: अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची जाधव, पटोलेंची मागणी
मुंबईतील बांगलादेशी घुसखोरी आणि फेरीवाल्यांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “किती बांगलादेशी येथे आलेत फिरतायत, त्यावर काय केलं? भोंग्यांची मोहीम ज्यांनी उचलली ते राज ठाकरे. महाराष्ट्र, मराठी भाषेचा सन्मान बाळासाहेबांनंतर कुणी करत असेल तर राज ठाकरेच,” असं त्यांनी गौरवोद्गार काढले. पण त्याच वेळी त्यांनी चेतावणीही दिली “राज ठाकरे यांनी जैन समाजाशी बोलावं, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू. पण जर सांगितलं ‘मारवाडीला थोबाडीत मारा’, तर त्यालाही आम्ही उत्तर देऊ. तुम्ही चालू करा मग आम्ही पण चालू करू.”
शेवटी त्यांनी लढाऊ पद्धतीने इशारा दिला “राजस्थानचे जे प्रवासी आहेत त्यांना सांगणार ‘तुम बटोगे तो पिटोगे’. कुठल्याही मारवाडीला धक्का लागला तर जशास तसे उत्तर दिलं जाईल. मराठी-मारवाडी वाद जर कोणी संपवू शकत असेल तर तो फक्त राज ठाकरेच. दुसऱ्या कोणात ती ताकद नाही.”
____








